वयाच्या 50 व्या वर्षीच नाही तर वयाची 100 ओलांडल्यानंतरही आपण आपले सौंदर्य गमावू नये असे वाटते. त्यामुळे तुम्हीही पन्नाशी गाठत असाल तर आतापासून या ब्युटी टिप्स फॉलो करा.
सनस्क्रीन वापरा : सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही जिथे जाल तिथे सनस्क्रीन नक्की वापरा.
त्वचेवरील बदल ओळख : तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान किंवा त्वचेत पूर्वी कधीही न झालेले बदल दिसत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार घ्या. या काळात दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शन वाढू शकते.
कोरडी त्वचा : वयाच्या 50 वर्षानंतर पीएच पातळी कमी होऊ लागते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. म्हणून भरपूर पाणी प्या. खोबरेल तेल, लोशन हे त्वचेसाठी वापरा.
आहार : पौष्टिक पदार्थ खा आणि सकस आहार घ्या. त्यासोबतच भरपूर ज्यूस प्या आणि फळे खा. सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्यावे.
क्रिम : वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसायला लागतात. त्यामुळे सुरकुत्या कमी करण्यासाठी वय कमी करणाऱ्या अँटी एजिंग क्रीम्स वापरा.
त्वचा उपचार : गरज पडल्यास सुरकुत्या काढणे, काळे डाग काढून टाकणे इत्यादी त्वचेच्या उपचारांबद्दल जाणून घ्या.
केसांची काळजी : या काळात डोक्यावरील केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे त्याची काळजी करू नका. आपण ते ट्रेंडी कसे बनवू शकता याचा विचार करा. हेअर कलर करा. स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग सारख्या तुमच्या आवडत्या स्टाईल वापरून पहा.
केसांची स्टाईल : केस गळण्याचे प्रमाण वयाबरोबर वाढते. त्यामुळे दाट दिसण्यासाठी केस लहान करा. तसेच तुमच्या आवडत्या स्टाइलमध्ये केस कापून घ्या.