• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • जगातील सर्वात मोठा Rabbit चोरीला; शोधून देणाऱ्याला मिळणार तब्बल 1 लाख

जगातील सर्वात मोठा Rabbit चोरीला; शोधून देणाऱ्याला मिळणार तब्बल 1 लाख

चोरी झालेला हा ससा (Rabbit stolen) 4 फूट 4 इंच इतका मोठा आहे.

  • Share this:
ब्रिटन, 14 एप्रिल : ससा (Rabbit) म्हटल्यावरच कापसारखा पांढराशुभ्र रंगाचा, माणकासारख्या लाल डोळ्यांचा गोंडस, इवलुसा ससा डोळ्यासमोर उभा राहतो. वाऱ्यानं पाठीवर पान पडलं तरी आकाश कोसळल्यासारखा भीतीनं सैरावैरा धावणारा ससा, हिरव्या चाऱ्याच्या मोहानं कासवाशीही पैज हरणारा ससा प्रत्येकाला बालपणापासून गाणी, गोष्टी यामधून भेटत आला आहे. प्रत्यक्षात मात्र त्याचं दर्शन प्राणीसंग्रहालय,अभयारण्यात किंवा शेतात घडतं. काही लोक घरीही इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे ससे पाळतात. पण हे प्रमाण खूपच कमी आहे. तर अशा या इवल्याशा प्राण्यानं सध्या सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. यामागे कारणही तसेच आहे. जगातील सर्वात मोठा ससा चक्क चोरीला (World’s Biggest Rabbit stolen) गेला आहे. आता जगातील सर्वांत मोठा ससा म्हणजे किती मोठा असेल असा प्रश्न पडला ना? तर हा ससा 4 फूट 4 इंच इतका मोठा आहे. गिनीज बुकमध्ये देखील (Guinness Book of World Records) त्याची नोंद आहे. अशा या जागतिक विक्रमवीर सशाचं नाव डॅरियस (Darius) असं आहे. हा ससा चोरीला गेल्यानं त्याची मालकीण अ‍ॅनेट एडवर्ड्स अतिशय दुःखी झाली असून, तिनं हा ससा परत आणून देणाऱ्या व्यक्तीला एक हजार पाऊंड म्हणजे तब्बल 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅनेटनं ट्विटरवर डॅरियसच्या चोरीविषयी माहिती दिली आहे. हे वाचा - न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले नंतर...; VIDEO पाहताच तुम्हालाही बसेल धक्का इंग्लडमधील (UK) वुर्स्टरशायरच्या स्टाल्टन भागात राहणारी माजी मॉडेल अ‍ॅनेट एडवर्ड्स गेल्या काही वर्षांपासून ससे पाळते. तिच्याकडे असे अनेक ससे आहेत. डॅरियस अ‍ॅनेटकडे अनेक वर्षांपासून असून तिला त्याचा खूपच लळा होता. डॅरियस खूपच लोकप्रिय होता. टीव्ही शो आणि इतर कार्यक्रमांमध्येही त्याचा सहभाग असे. पण अलिकडे अ‍ॅनेटनं त्याला शांत आयुष्य जगता यावं यासाठी टीव्ही शो आणि इतर कार्यक्रमांमध्ये पाठवणं बंद केलं होतं. हे वाचा - Shocking! चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि... गेल्या शनिवारी कुणीतरी त्याला चोरून नेलं. डॅरियसला का आणि कशासाठी चोरण्यात आलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॅरियस आता वृद्ध झाला असून तो पिल्लं जन्माला घालू शकत नाही. त्यामुळे कृपया त्याला परत द्यावं असं आवाहन अ‍ॅनेटनं केलं आहे. पोलीसही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं अ‍ॅनेटनं ट्विटरवर म्हटलं आहे.
First published: