Home /News /lifestyle /

न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले नंतर...; VIDEO पाहताच तुम्हालाही बसेल धक्का

न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले नंतर...; VIDEO पाहताच तुम्हालाही बसेल धक्का

मित्राचे केस कापता कापता न्हाव्याने (barber) जे काही केलं, तसं करण्याचं धाडस कुणाचंच होणार नाही.

  माद्रिद, 14 एप्रिल : मित्र, दोस्त, लंगोटी यार, जिगरी यार हे शब्द तसे म्हणायला खूप सोपे. पण जेव्हा वेळ येते तेव्हाच हे नातं किती खरं आहे आणि किती खोटं हे दिसतं. आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत असं म्हणणारे तर अनेक वेळा ऐन अडचणीत पाठ फिरवतात. त्यापैकी मोजकेच खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. सध्या अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी जे केलं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. स्पेनमधील (Spain) बार्बर जोएल ओर्टेगा (Joel Ortega) आपला मित्र नेफताली मार्टिन (Neftali Martin) याचे कापत होता. मित्राचे केस कापता  कापता त्याने असं काही केलं की ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा टिकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतो आहे.
  व्हिडीओत पाहू शकता जोएल नेफतालीचे केस कापतो. काही वेळानंतर तेच मशीन तो आपल्या डोक्यावरून फिरवतो आणि आपल्या डोक्यावरील केस काढतो. जोएलला असं पाहून नेफतालीसुद्धा शॉक होतो. तो स्तब्धच राहतो आणि त्याला रडूच कोसळतं. आता जोएल नेमकं असं का करतो आणि नेफतालीला रडू कोसळतं, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. हे वाचा - Shocking! चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि... जोएल असतो करतो ते आपला मित्र नेफतालीला आधार देण्यासाठी नेफतालीला कॅन्सर आहे. कॅन्सरवरील उपचारांच्या दुष्परिणामांपैकी एक म्हणजे केस गळणं. त्यामुळे नेफताली आपले केस काढताना दिसत आहे, पण त्याच वेळी त्याचा चेहराही गंभीर आहे. कोणत्यातरी तो चिंतेत असल्याचं दिसतो. जोएलला आपल्या मित्राला असं पाहवत नाही. त्याची काय अवस्था होत असेल याची कल्पना त्याला आली आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता काही क्षणातचं त्यानेसुद्धा नेफतालीसारखे आपले डोक्यावरील केस उडवले.  कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढणाऱ्या आपल्याला मित्राला सोबत करण्यासाठी जोएलने असं धाडसी पाऊल उचललं. नेफतालीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याने स्पॅनिश भाषेत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तू एकटा नाहीस. हे माझ्या त्या महान मित्राचे शब्द होते. त्यानंतर त्याने लगेच आपले कापले. हे वाचा - अरे बापरे! बिस्कीट खाताच मॉडेलला मारला लकवा; आता झाली भयंकर अवस्था हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण भावुक झाला आहे. तशाच इमोशनल कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. या व्हिडीओने थेट हृदयालाच हात घातला आहे. मित्रमैत्रीण असावेत आणि मैत्री असावी तर अशीच. असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Cancer, Viral, Viral videos

  पुढील बातम्या