Home /News /lifestyle /

Shocking! कुत्रा-मांजरांसारखं चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि...

Shocking! कुत्रा-मांजरांसारखं चक्क मगरींनाच खाजवायला गेली; जबड्याजवळ हात नेला आणि...

मगरीच्या जबड्याला खाजवण्याचा आनंद महिला (woman scratching crocodile chin) घेत होती. पण हा व्हिडीओ पाहणाऱ्याला मात्र चांगलीच धडकी भरते.

  वॉशिंग्टन, 14 एप्रिल : मगर (Crocodile)... फक्त नाव जरी घेतलं तरी घाम फुटतो. खऱ्या मगरीच्या (Alligators) जवळ जाणं तर दूर तिला लांबून पाहायचीसुद्धा अनेकांची हिंमत होत नाही. जणू काही ती उडी मारूनच आपल्या अंगावर येईल अशी अनेकांना भीती वाटते. पण अमेरिकेतील एका महिलेनं मात्र एक नाही तर दोन मगरींच्या जवळ जाण्याची हिंमत केली. ती फक्त त्यांच्या जवळ गेली नाही. तर कुत्रा-मांजर अशा पाळीव प्राण्यांना जसं खाजवावं तसं ती चक्क या मगरींना खाजवायला (woman scratching crocodile chin) गेली. मगरींजवळ जाऊन त्यांना हात लावण्याची डेअरिंग करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video) होतो आहे. जितकी  भीती त्या महिलेला मगरींजवळ गेल्यावर वाटली नाही. त्याच्या कित्येक पटीने आपल्याला हा व्हिडीओ पाहून वाटते.
  हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील (California) रेप्टाइल झूमधील (Reptile Zoo) असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओत पाहू शकता ही झूमध्ये दोन मगरी अगदी शांतपणे बसल्या आहेत. ज्या काचेच्या बॉक्समध्ये या मगरींना ठेवण्यात आलं आहे, ती काच खुली असल्याचं दिसतं आहे. मगरी अगदी काचेच्या बाहेर तोंड ठेवून आहेत. हे वाचा - अरे बापरे! जंगल सफारी करताना चक्क गाडीतच घुसला सिंह आणि... Shocking Video Viral तिथंच एक महिला आहे. जी या मगरींशी बोलताना दिसते आहे. बोलत बोलत ती त्यांच्या जवळ जाते. त्यानंतर आपला हात त्यांच्या जबड्याजवळ नेते. आपण जसं कुत्रा, मांजर, गाय अशा पाळीव प्राण्यांना प्रेमाने कुरवाळतो, गोंजारतो किंवा खाजवतो अगदी तसंच या महिलेने या मगरींसोबत केलं. मगरींच्या जबड्याच्या खालच्या बाजूला तिने खाजवलं. एक नाही तर दोन्ही मगरींसोबत तिनं हेच केलं. सुरुवातीला ज्या मगरीला तिने पहिल्यांदाच खाजवलं ती तशी शांत दिसत होती. पण दुसऱ्या मगरीला मात्र तिने खाजवलं तेव्हा ती मगर थोडी संतप्त झाल्याचंही दिसते. ती महिलेवर उडी मारण्याचाही प्रयत्न करते. पण सुदैवाने जसा विचार आपण करत होतो, तसं काही होत नाही. हे वाचा - प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल मगरींना अशा पद्धतीने हात लावणं हे त्या महिलेसाठी मजेशीर असेल पण व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा शॉकिंग आहे. त्यावर तशाच प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने तर दुसरी मगर सांगते आहे. यावेळी वाचलीस. पुढच्या वेळी तुला सोडणार नाही. अशीच कमेंट केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या