मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /World AIDS Day 2021: HIV बरा होतो का? जाणून घ्या काय आहेत लक्षणं आणि उपचार

World AIDS Day 2021: HIV बरा होतो का? जाणून घ्या काय आहेत लक्षणं आणि उपचार

ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) हा विषाणू एड्ससाठी (AIDS) कारणीभूत ठरतो. या आजारानं 17 जुलै 2021 पर्यंत 36.3 दशलक्ष जणांचा बळी घेतला आहे.

ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) हा विषाणू एड्ससाठी (AIDS) कारणीभूत ठरतो. या आजारानं 17 जुलै 2021 पर्यंत 36.3 दशलक्ष जणांचा बळी घेतला आहे.

ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) हा विषाणू एड्ससाठी (AIDS) कारणीभूत ठरतो. या आजारानं 17 जुलै 2021 पर्यंत 36.3 दशलक्ष जणांचा बळी घेतला आहे.

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : एचआयव्ही एड्समुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचा जीव गेला आहे. 1988 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन (World AIDS Day) म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून दर वर्षी 1 डिसेंबरला जगभरात एड्स दिन पाळला जातो. हा दिवस जगभरातल्या नागरिकांना एचआयव्हीविरुद्धच्या लढाईमध्ये एकत्र येण्याची संधी देतो. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) हा विषाणू एड्ससाठी (AIDS) कारणीभूत ठरतो. या आजारानं 17 जुलै 2021 पर्यंत 36.3 दशलक्ष जणांचा बळी घेतला आहे. 2020 च्या अखेरीस साधारण 37.7 दशलक्ष जण एचआयव्हीग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडे उपलब्ध असलेली आकडेवारी पाहता एचआयव्ही/एड्स ही जागतिक स्तरावरची सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या असल्याचं लक्षात येतं.

    एड्सबद्दल लोकांच्या मनामध्ये स्टिग्मा (stigma) आहे. त्यामुळे अनेक जण उपचार घेण्यासाठी पुढे येत नाहीत. आपल्याला एड्सची लागण झाल्याचं बाहेर आल्यास समाज आपल्याला नाकारेल (rejection), अशी भीती अनेकांच्या मनात आहे. भीती, नकार, बहिष्कार आणि भेदभावाच्या (discrimination) या भावना एड्सच्या प्रसाराला आणखी खतपाणी घालत आहेत. त्यामुळे याविरोधात जागरूकता (awareness) निर्माण करणं महत्त्वाचं आहे. एड्सची लक्षणं, प्रसाराच्या पद्धती आणि उपलब्ध उपचार याची माहिती नागरिकांना देणं, या जागरूकता मोहिमेतल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

    एचआयव्ही एड्सची लक्षणं (HIV/AIDS Symptoms) -

    कुठलाही आजार झाला आहे, हे लक्षात येण्यासाठी आपल्याला त्याची लक्षणं माहिती पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला पुढची कार्यवाही करता येणार नाही. एचआयव्हीची लक्षणं (symptoms) व्यक्तिपरत्वे भिन्न असतात. संसर्गाच्या (HIV infection) टप्प्यावरदेखील ती अवलंबून असतात. एचआयव्ही झालेल्या व्यक्ती संसर्गानंतर पहिल्या काही महिन्यांत सर्वांत जास्त घातक (संसर्गजन्य) असतात, मात्र अनेकदा संसर्ग झाल्याचं समजतच नाही. कारण एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणं अतिशय साधी असतात. संसर्ग झाल्यानंतर पहिल्या काही आठवड्यांत रुग्णाला ताप येतो, डोकेदुखी सुरू होते, पुरळ येते किंवा घसा खवखवतो. काहींना एन्फ्लुएन्झा (influenza) झाल्यासारखी लक्षणं दिसतात. यामुळे आपल्याला एचआयव्ही झाला आहे, हे लवकर लक्षातही येत नाही. जेव्हा विषाणू व्यक्तीच्या शरीरामध्ये आपलं बस्तान बसवतो तेव्हा तो हळूहळू रोगप्रतिकारशक्ती कमी करतो.

    त्यानंतर व्यक्तीमध्ये आणखी वेगळी लक्षणं दिसू लागतात. लिम्फ नोड्सवर सूज येणं, वजन कमी होणं, ताप येणं, अतिसार आणि खोकला अशी लक्षणं विकसित होतात. यावर वेळीच उपचार मिळाले नाही तर क्षयरोग (TB), क्रिप्टोकोकल मेंदूज्वर, जिवाणू संसर्ग (bacterial infection), लिम्फोमास (lymphomas) आणि कपोसी (Kaposi) यांसारखे गंभीर आजारही होऊ शकतात.

    औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती आहे महत्त्वाची

    एचआयव्ही संसर्गाचे मार्ग -

    - संक्रमित व्यक्तीचं रक्त, आईचं दूध, वीर्य आणि योनिस्राव या माध्यमांतून एचआयव्ही पसरू शकतो.

    - एचआयव्हीग्रस्त गरोदर आईकडून बाळाला संसर्ग होऊ शकतो.

    - असुरक्षित सेक्स ( unprotected sex) केल्यासही संसर्गाचा धोका आहे.

    - संसर्ग झालेल्या व्यक्तीसाठी वापरलेल्या सुया, सीरिंज किंवा इतर वैद्यकीय उपकरणांमुळेही एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो.

    - दूषित सुया, ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा इतर वैद्यकीय उपचारांदरम्यान एचआयव्हीची लागण होऊ शकते.

    एचआयव्ही बरा होतो का?

    एचआयव्ही हा व्यक्तीच्या रोगप्रतिकारप्रणालीवर हल्ला करतो. त्यामुळे शरीर विविध प्रकारचे संसर्ग आणि कर्करोगासारख्या आजारांपासून स्वत:चं संरक्षण करण्यास अपयशी ठरतं. डब्ल्यूएचओच्या मते, एचआयव्ही संसर्गावर कोणताही एक खात्रीशीर इलाज (Cure) नाही, मात्र प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास तो होत नाही. तरीही तो झाल्यास त्याचं निदान योग्य वेळी झाल्यास विविध उपचारांच्या मदतीने एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगता येतं. अँटीरेट्रोव्हायरल (ARV) औषधांनी उपचार करून एचआयव्हीचं व्यवस्थापन करता येतं.

    सावधान! पोटदुखीसह ‘ही’सुद्धा असू शकतात Heart Attack ची लक्षणं; वेळीच व्हा सावध

    अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) एचआयव्ही संसर्ग पूर्णपणे बरी करत नसली तरी, ती शरीरात विषाणूची हालचाल मंद करण्याचं काम करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पूर्ववत होण्यास मदत होते. 2016 पासून डब्ल्यूएचओने सर्व एचआयव्हीग्रस्तांना आजीवन एआरटी प्रदान करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये बालकं, किशोरवयीन मुलं, प्रौढ व्यक्ती, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

    सध्याची स्थिती पाहता एचआयव्ही नक्कीच एक मोठी समस्या आहे. नियोजनबद्ध पद्धतीने तिच्याशी सामना केल्यास रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: Health Tips