मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! पोटदुखीसह ‘ही’सुद्धा असू शकतात Heart Attack ची लक्षणं; वेळीच व्हा सावध

सावधान! पोटदुखीसह ‘ही’सुद्धा असू शकतात Heart Attack ची लक्षणं; वेळीच व्हा सावध

पोटदुखीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो

पोटदुखीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो

ही लक्षणं हृदयविकाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ

  मुंबई, 29 नोव्हेंबर: सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे (health) दुर्लक्ष होतं. आहारातल्या पोषणमूल्यांची कमतरता, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यांमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं झालं आहे. वृद्धांबरोबरच अनेक गंभीर आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. हृदयाचे विकार (symptoms of Heart Attack) असल्यास रुग्णाला छातीत दुखणं, मान दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं आदी समस्या उद्भवतात. यासोबतच इतरही काही गोष्टी हृदयविकारांचे संकेत देतात. हृदयविकार होण्यापूर्वी आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत ओळखले, तर तुम्ही वेळीच योग्य ती पावलं उचलू शकता. धमन्यांमध्ये समस्या निर्माण झाल्यास हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यात पोटाशी संबंधितही काही लक्षणं असतात. उदा. पोटदुखी (Stomach Pain) आणि गॅस होणं (Gasses). याकडे सहसा आपण दुर्लक्ष करतो; मात्र ही लक्षणं हृदयविकाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने याबाबत माहिती दिली आहे.

  छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असल्याचं आपल्याला माहिती असतं. याशिवाय हृदयविकाराची काही अस्पष्ट लक्षणं असतात. शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा न झाल्यास पोटात अनेक प्रकारचे रासायनिक बदल होतात. अशा स्थितीत पचनसंस्थेसह पोटातले अनेक अवयव नीट काम करू शकत नाहीत आणि पोटदुखी, गॅस अशा अनेक समस्या उद्भवतात. पोटात निर्माण होणाऱ्या या समस्यासुद्धा हृदयविकाराचे संकेत असू शकतात.

  रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि छातीत दुखतं; मात्र यावेळी पोटदुखीची समस्यासुद्धा रुग्णांमध्ये दिसून आली आहे. पोटदुखीची समस्या हार्ट अॅटॅकचं लक्षणही असू शकतं. हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नसल्यास शरीरातलं रक्ताभिसरण थांबतं. यामुळे पोटात आम्लता वाढते. यासोबतच अपचन आणि ढेकर येणं हेसुद्धा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचं लक्षणं असू शकतं. संशोधनानुसार, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अपचन आणि ढेकर येण्याची समस्या अधिक असू शकते. तुम्ही या लक्षणांना गांभीर्याने घ्या. तुम्हालाही अचानक पोटदुखी, ढेकर, अपचन (Indigestion And Burping) होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.

  हेअर सेटिंगचा गावठी जुगाड, हा Viral Video पाहिलात का?

  धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास आतड्याला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. यामुळे जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होतो. तसंच धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर पोटाजवळ वेदना होतात. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये हेसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं. धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीराच्या सर्व भागांना होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पचनसंस्थेच्या कार्यावरही परिणाम होतो. पोटात आम्ल वाढल्याने अन्न नीट पचत नाही. यामुळे पोषक तत्त्वं शरीराला मिळत नाहीत. तेव्हा शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिड (HCI) वाढतं आणि मळमळ होते. या समस्येचं योग्य वेळी निदान न केल्यास रुग्णाला अल्सरही होऊ शकतो.

  पोट दुखणं, मळमळणं ही सामान्य लक्षणं आहेत. इतर आजारांमध्येसुद्धा ही लक्षणं दिसतात. त्यामुळे कोणती लक्षणं हृदयविकाराच्या झटक्याची आहेत आणि कोणती लक्षणं सर्वसामान्य आहेत, हे रुग्णाला ओळखणं कठीण जातं. त्यामुळे तुम्हाला चक्कर , घाम , थकवा, अशक्तपणा, उलट्या (Vomiting), मळमळ (Nausea), पोटदुखी, छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  हृदयाचे गंभीर आजार टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आहार आणि जीवनशैलीत बदल करावा, दारू पिणं बंद करावं, जंक फूड खाणं टाळावं आणि ताजी फळं व भाज्या खाव्यात, व्यायाम आणि योगासनं करावीत. तसंच दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा. लक्षणं दिसताच निष्काळजीपणा करू नये. त्रास वाढल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. ही काळजी घेतल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Health, Tips