मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं

औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं

औषधांबद्दल महत्त्वाच्या बाबींमध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, जी औषधे खाण्यापूर्वी तपासणे खूप महत्त्वाचे आहे. काही औषधांवर एक लाल रेषा असते. ही लाल रेषा नेमकी का असते, याबाबत जाणून घेऊया (What Does Red Line Means on Medicine?).

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : आपल्या कुटुंबात कोणी थोडंसंही आजारी पडलं की, घरातीलच कोणीतरी कोणती गोळी खायचे हे सांगतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर ते औषध मेडिकलमधून आणले जाते. असे करणे धोकादायक ठरू शकते, परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत. मात्र, बरेच लोक औषधांची एक्सपायरी डेट (Expiry Date of Medicine) नक्कीच तपासतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, औषधांबद्दल महत्त्वाच्या बाबींमध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, जी औषधे खाण्यापूर्वी तपासणे खूप महत्त्वाचे आहे. काही औषधांवर एक लाल रेषा असते. ही लाल रेषा नेमकी का असते, याबाबत जाणून घेऊया (What Does Red Line Means on Medicine?).

अशा अनेक औषधांची पाकिटे तुम्ही पाहिली असतील, ज्यावर लाल रंगाची रेषा असते. त्या पट्टीचे काम काय असा प्रश्न एखाद्याला विचारला तर तो सांगेल की, ती औषध कंपनीची रचना आहे. पण प्रत्यक्षात, त्या पट्टीचे खूप महत्त्वाचे काम असते, ज्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. एक्सपायरी डेटप्रमाणेच, हा बार तुम्हाला औषधाबद्दलच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगतो.

लाल पट्टी काय दर्शवते?

हे वाचा - Special Story : घरखरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस कसे ठरवले जातात?

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 2016 मध्ये ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी लाल पट्टी म्हणजे काय ते तपशीलवार सांगितले होते. ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत. या औषधांमध्ये प्रतिजैविक मुख्य आहेत. या पट्ट्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेऊ नयेत असा संकेत आहेत.

हे वाचा - Special Story : पंतप्रधान आवास योजनेची ही वैशिष्ट्ये आणि लाभ जाणून घ्या

डॉक्टरांना सांगूनच औषधे घ्यावीत

अनेकवेळा आपण दुकानदाराकडूनच औषध मागवतो. अशा स्थितीत पट्टी पाहून ते औषध कसे खावे हे तपासता येते. मात्र, स्वत: किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण पट्टी नसलेली औषधे खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Medical