मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

व्यायामाअगोदर आणि नंतरच्या या चुकीच्या सवयी सर्वात हानिकारक ठरतात; लगेच बदला

व्यायामाअगोदर आणि नंतरच्या या चुकीच्या सवयी सर्वात हानिकारक ठरतात; लगेच बदला

रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये विशेषतः त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचतात. वर्कआऊट केल्यानंतर तुमच्या त्वचेवर चमक दिसून येते, परंतु तुम्ही वर्कआउटच्या आधी आणि नंतर काही चुका करणं टाळले पाहिजे.

रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये विशेषतः त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचतात. वर्कआऊट केल्यानंतर तुमच्या त्वचेवर चमक दिसून येते, परंतु तुम्ही वर्कआउटच्या आधी आणि नंतर काही चुका करणं टाळले पाहिजे.

रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये विशेषतः त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचतात. वर्कआऊट केल्यानंतर तुमच्या त्वचेवर चमक दिसून येते, परंतु तुम्ही वर्कआउटच्या आधी आणि नंतर काही चुका करणं टाळले पाहिजे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : वर्कआउट (Work Out) करण्यापूर्वी तुमची त्वचा निस्तेज असते आणि त्वचेच्या पेशी विश्रांतीच्या स्थितीत असतात. नियमित व्यायामाचा तारुण्य टिकवण्यासाठी उपयोग होतो आणि त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. योगा, पायलेट्स आणि कार्डिओसारखे वर्कआउट तुमची मुद्रा सुधारण्यास मदत करतात. यामुळे हालचाल आणि लवचिकता सुधारते आणि तुम्ही अधिक तरुण (Extra Young) दिसू लागता. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये विशेषतः त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचतात. वर्कआऊट केल्यानंतर तुमच्या त्वचेवर चमक दिसून येते, परंतु तुम्ही वर्कआउटच्या आधी आणि नंतर काही चुका करणं टाळले पाहिजे.

कसरत (वर्क आऊट) करण्यापूर्वी

कोणत्याही प्रकारच्या मेकअप आणि कॉस्मेटिकसह व्यायाम केल्याने तुमचे नुकसान होईल. यामुळे, छिद्र आणि घामाच्या ग्रंथी ब्लॉक होतात. यामुळे, जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा त्वचेच्या छिद्रांमधून हवा खेळती राहत नाही.

व्यायाम करण्यापूर्वी, त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

वर्कआउट करताना जास्त घाम आल्याने शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते आणि त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो. चेहरा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावा. यामुळे ओठ फुटण्याची समस्या उद्भवणार नाही.

जर तुम्ही घराबाहेर व्यायाम करत असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या शरीराचे संरक्षण करेल.

बॅक्टेरिया आणि जंतूंपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अँटीपर्सपिरंट लावा.

व्यायामानंतर -

वर्कआउट केल्यानंतर चेहरा पूर्णपणे धुवा. घामामुळे बॅक्टेरिया त्वचेला चिकटून राहतात. चेहरा थंड पाण्याने आणि फेस क्लिन्झरने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाम, धुळीचे कण आणि तेल निघून जाईल.

हे वाचा - मोदी सरकारकडून पेन्शनधारकांसाठी खुशखबर; लवकरच पेन्शन वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता

वर्कआऊट केल्यानंतर त्वचा संवेदनशील बनते, त्यामुळे लगेच मॉइश्चरायझरसारख्या वस्तू चेहऱ्यावर लावू नका. अनेक उत्पादने एकत्र वापरल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते.

व्यायामानंतर थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे रोमछिद्र बंद होतील आणि त्वचा थंड होण्यास मदत होईल. काही वेळाने कूलिंग जेल आणि मॉइश्चरायझर लावा.

व्यायामानंतर ग्लायकोलिक अॅसिड, रेटिनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी लावू नका.

Isopropyl Myristate असलेले केस कंडिशनर देखील वापरू नका. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा - अनोखं गाव; इथे प्रत्येक व्यक्ती आहे शुद्ध शाकाहारी, मांस तर सोडाच पण दुधाचंही नाही करत सेवन

तुमच्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरिया आणि जंतू चिकटून राहतात.

हलके आणि सैल फिटिंगचे कपडे घाला. यामुळे त्वचेवर जळजळ होणार नाही.

त्वचेसाठी एक क्रीम वापरा ज्यामध्ये कॅफिनचे प्रमाण चांगले असावे. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले आर्गन तेल देखील वापरले जाऊ शकते. हे पोस्ट वर्कआउट मॉइश्चरायझर म्हणून काम करेल.

वर्कआउट्सद्वारे शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याव्यतिरिक्त रक्त प्रवाहाद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. व्यायाम केल्याने शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेच्या नवीन पेशी तयार होतात, त्यामुळे काही खास गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही वर्कआउटचा पूर्ण फायदा घेऊ शकता.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Types of exercise, Workout