मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Work From Home मुळे वाढतंय वजन? 'हे' 4 पदार्थ दाखवतील जादूई परिणाम

Work From Home मुळे वाढतंय वजन? 'हे' 4 पदार्थ दाखवतील जादूई परिणाम

वजनही नियंत्रित राहील - 
बरेच लोक तंदुरुस्त आणि सडपातळ राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पितात. यामुळे वजनही कमी होते. जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आवळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.

वजनही नियंत्रित राहील - बरेच लोक तंदुरुस्त आणि सडपातळ राहण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पितात. यामुळे वजनही कमी होते. जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आवळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा.

Work From Home दोन वर्षं झाली तरी अद्याप सुरूच आहे. यामुळे हालचाली, धावपळ कमी झाली. खाण्याच्या सवयी बदलल्या, बैठं काम असल्याने वजनवाढीची समस्या चांगलीच वाढली असल्याचं दिसत आहे.

  दिल्ली, 1 फेब्रुवारी: कोरोना साथीची (Coronavirus Pandemic) सुरुवात झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याकरिता अनेक कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली. अद्यापही धोका कायम असल्यानं कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची (Work From Home) मुभा दिली आहे. घरून काम करण्याचे काही फायदे झाले असले, तरी त्याचे काही तोटेही जाणवू लागले आहेत. या काळात सर्वांची जीवनशैली पूर्णपणे बदलली असून, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचं दिसत आहे.

  घरी असल्यामुळे अनेकांचं रूटीन बदलून गेलं आहे. शारीरिक हालचाली, व्यायाम कमी झाल्यानं अनेकांना थायरॉईड, मधुमेह असे अनेक आजार विळखा घालत आहेत. खाण्याच्या सवयी बदलल्या असून, बैठं काम असल्यानं सतत बसून राहण्यानं वजनवाढीची समस्या चांगलीच वाढली असल्याचं दिसत आहे.

   जेवल्यानंतर जडपणा येण्याची, तसंच कामावर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रारही वाढली आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास या तक्रारी दूर करणं शक्य होईल. हे पदार्थ कोणते त्याविषयी जाणून घेऊ या...

  दही : जडपणा जाणवत असेल तर जेवताना दही खाणं (Curd) हा एक चांगला उपाय आहे. दह्यामध्ये असलेले बॅक्टेरिया (Bacteria) पचनक्रिया मजबूत करतात. पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी दही अत्यंत उपयुक्त ठरतं. लहान मुलंही आवडीनं खातात. हिवाळ्यात शक्यतो दही दुपारी खावं, रात्री खाऊ नये.

  ओट्स - जडपणा, काम करण्यास उत्साह न वाटणं अशा समस्यांवर ओट्सचा उपमा (Oats Upma) हा अगदी उत्तम उपाय आहे. ओट्स पचायला हलके असतात. तसंच त्यात फायबर भरपूर असतात. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. निरोगी पचनसंस्थेसाठी दिवसातून एकदा ओट्स उपमा नक्की खा.

  Flat Tummy साठी प्रयत्न करताय? बडिशेपचा वापर करत कमी करा वजन; वाचा सविस्तर

  ओट्सचा उपमा बनवताना त्यात गाजर आणि हिरव्या पालेभाज्या घातल्यास तो अजून पौष्टिक होतो.

  बीट : लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल्या बीटचा (Beetroot) आहारात समावेश केल्यास पचनशक्ती सुधारतेच; पण इतर अनेक आजारांपासूनही संरक्षण होतं. बीट सॅलडच्या स्वरूपात खाता येतो किंवा त्याचा रस काढून पिता येतो.

  सफरचंद : व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससह फायबर्सही मुबलक प्रमाणात असलेलं फळ म्हणजे सफरचंद (Apple). पचनसंस्था निरोगी ठेवण्यात फायबर्सची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच डॉक्टर दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद नियमितपणे खाल्ल्यास चेहऱ्यावर चमकही राहते. दिवसातून एकदा सफरचंदाचा रसदेखील घेऊ शकता.

  आपल्या परिसरात घेतल्या जाणाऱ्या भाज्या, सहज मिळणारी फळं आणि दह्यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वर्क फ्रॉम होममुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींवर मात करता येईल.

  First published:

  Tags: Food, Weight loss, Weight loss tips, Work from home