मुंबई, 31 जानेवारी: बडिशेप सामान्यपणे अनेकांच्या स्वयंपाकघरात असते. बडिशेप अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. अनेकांना जेवल्यानंतर बडिशेप खाण्याची सवय असते. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. मात्र बडिशेप केवळ माऊथ फ्रेशनरचे काम करत नाही तर ही खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. विशेष म्हणजे, वजन कमी करण्यासाठी देखील बडिशेपचा उपयोग होऊ शकतो. तर आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी बडिशेपचा उपयोग कसा होतो हे सांगणार आहोत. चुकीची लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सध्याच्या घडीला वजन कमी करणं सोपं काम नाही. सध्याचा काळात कोरोना महामारीमुळे (Lifestyle during Coronavirus Pandemic) अनेक जण घरून काम करत आहेत. त्यांच्यासाठी वाढलेलं वजन कमी करणं आणखी कठीण होत आहे. आपल्या दिनचर्येत नियमित व्यायाम आणि निरोगी आहाराचा समावेश करून वजन कमी करणं शक्य असलं तरी, प्रत्येकाला आहार आणि फिटनेसची पथ्यं पाळणं इतकं सोपं नसतं. पण वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही नियमितपणे बडिशेप खाण्यास सुरुवात करा. बडिशेप कमी वेळेत वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वाचा- हिरवी मिरचीही खायला हवी.. कारण आरोग्यासाठी फायदेही आहेत तितकेच झणझणीत बडिशेपचा उल्लेख सुपरफूड म्हणून केला जातो. बडिशेपमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. बडिशेपचे सेवन करण्याच्यादेखील अनेक पद्धती आहेत. काही लोकांना बडिशेप खायला आवडत नाही. मात्र, वजन तर कमी करायचे आहे. आशा लोकांनी या पद्धतींचा वापर केला पाहिजे. बडिशेपचे सेवन हे लठ्ठपणा कमी करण्याचा हा एक उत्तम आणि स्वस्त मार्ग आहे. याशिवाय, पाण्यासोबत बडिशेप खाल्ल्याने पोटदुखी कमी होते आणि पचनक्रिया सुधारते, असे म्हणतात. तुम्ही वजन कमी करण्यासाठी बडिशेपचे पावडर स्वरूपात सेवन करू शकता. यासाठी मूठभर बडिशेप घेऊन ती चांगली बारीक करून त्याची पावडर बनवा. चवीनुसार आणि चांगल्या पचनशक्तीसाठी तुम्ही त्यात मेथीचे दाणे, काळे मीठ, हिंग आणि साखरही टाकू शकता. जर तुम्ही दररोज असं केलं तर काही वेळेनंतर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. हे वाचा- रात्री उशिरा जेवणाऱ्यांना या गंभीर आजाराचा धोका, वेळीच बदला तुमची ही सवय बडिशेप चहा प्यायल्यानेदेखील वजन कमी करता येतं. तसंच याचा परिणामदेखील लवकर दिसून येतो. विशेष गोष्ट म्हणजे बडिशेप चहा बनवण्यास जास्त वेळही लागत नाही. दैनंदिन आहारातही आपण बडिशेपचा अतिशय चांगल्या पद्धतीने समावेश करु शकतो. शरीरासाठी आरोग्यदायी असणारा हा पदार्थ आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







