मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips: अंडी कि पनीर? वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कशात असतात जास्त Protein

Weight Loss Tips: अंडी कि पनीर? वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कशात असतात जास्त Protein

प्रथिनं पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक (Building block) म्हणून काम करतात. शारीरिक व्यायामादरम्यान त्याचं सेवन वाढवल्यानं चरबी किंवा लठ्ठपणा कमी होऊन स्नायू मजबूत होऊ लागतात. ज्यामुळं तुम्ही अधिक तंदुरुस्त दिसू शकता.

प्रथिनं पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक (Building block) म्हणून काम करतात. शारीरिक व्यायामादरम्यान त्याचं सेवन वाढवल्यानं चरबी किंवा लठ्ठपणा कमी होऊन स्नायू मजबूत होऊ लागतात. ज्यामुळं तुम्ही अधिक तंदुरुस्त दिसू शकता.

प्रथिनं पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक (Building block) म्हणून काम करतात. शारीरिक व्यायामादरम्यान त्याचं सेवन वाढवल्यानं चरबी किंवा लठ्ठपणा कमी होऊन स्नायू मजबूत होऊ लागतात. ज्यामुळं तुम्ही अधिक तंदुरुस्त दिसू शकता.

नवी दिल्ली, 31 जानेवारी: लठ्ठपणा कमी करायचा असो किंवा स्नायू मजबूत (Muscle building) करायचे असोत, आहारात प्रथिनांचं (Protein) प्रमाण वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रथिनं पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक (Building block) म्हणून काम करतात. शारीरिक व्यायामादरम्यान त्याचं सेवन वाढवल्यानं चरबी किंवा लठ्ठपणा कमी होऊन स्नायू मजबूत होऊ लागतात. ज्यामुळं तुम्ही अधिक तंदुरुस्त दिसू शकता. जेव्हा आहारात प्रथिनं घेण्याचा विचार येतो तेव्हा अंडी आणि पनीर यांचा विचार केला जातो. हे दोन्ही पदार्थ लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आहारात घेणं फायदेशीर (Weight Loss Tips) आहे.

अंडी आणि पनीर दोन्ही शिजवण्यास सोपे आहेत आणि दोन्ही पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहेत. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. परंतु मांसाहारी लोकांसाठी दोन पर्याय आहेत. जाडी कमी करण्यासाठी दोन्ही खूप चांगले आहेत. पण या दोन्हींपैकी अधिक चांगला पर्याय कोणता, हे आज जाणून घेऊयात.

अंडी कशी फायदेशीर ठरतात?

तसं पाहिलं तर, अंडी तुलनेनं स्वस्त आहेत. त्यामध्ये प्रथिनंदेखील खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. शरीराला दिवसभरात आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजं अंड्यांमध्ये असतात. एका संपूर्ण अंड्यामध्‍ये 6 ग्रॅम प्रथिनं आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीराला नीट कार्य करण्‍यासाठी आवश्यक असतात. तुम्ही तळलेली अंडी, उकडलेली अंडी, अंडा करी खाऊ शकता. पण बरेच लोक अंड्यातील पिवळा बलक जास्त चरबीयुक्त असल्याचं समजून खात नाहीत. खरं तर, अंड्यातील पिवळ बलकामध्ये पोषक तत्वे उत्तम प्रमाणात असतात, हे त्यांना माहीत नसतं.

पनीर खाण्याचे फायदे

पनीर हा भारतातील सर्वात लोकप्रिय दुग्धजन्य पदार्थ आहे. सॅलड, सँडविच किंवा भाजी बनवण्यासाठी लोक पनीरचा अधिक वापर करतात. हा दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि रायबोफ्लेविन सारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. 40 ग्रॅम पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रोटीन आणि सुमारे 5 ग्रॅम फॅट असतं, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं असते.

हे वाचा - Weight Loss Winter: हिवाळ्यात वजन कमी करण्याचं आव्हान बनलंय मोठं; खाण्या-पिण्यातील हे छोटे बदल आहेत पुरेसे

वजन कमी करण्यासाठी अंडं चांगलं की पनीर?

अंडी असो की पनीर, दोन्हींमध्ये पोषक घटकांचं प्रमाण साधारण सारखंच असतं. त्यामध्ये शरीरात प्रथिनं बनविणारे सर्व नऊ पोषक घटक असतात. दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि व्हिटॅमिन डी खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. हे दोन पोषक घटक वनस्पती-आधारित अन्न उत्पादनांमध्ये क्वचितच आढळतात.

हे वाचा - Fennel For Weight Loss: डाएट प्लॅन-व्यायामानंही वजन घटेना, या पद्धतीनं बडीशेप वापरून पाहा परिणाम

पनीर खाणं स्थूलपणा कमी करण्यासाठी अंड्याइतकंच फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, हे दोन्ही स्थूलपणा कमी करण्यासाठी चांगलेच आहेत. हे दोन्ही पर्याय आलटून-पालटून आपल्या आहारात समाविष्ट करता आल्यास सर्वांत चांगलं ठरतं. मात्र, किमतीच्या दृष्टीनं पाहिल्यास अंडी हा स्वस्त पर्याय आहे. पूर्णपणे शाकाहारी असलेल्या लोकांसाठी पनीरचा पर्याय उत्तम ठरेल.

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips, Weight, Weight loss tips, Wellness