जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pregnant Women: प्रसूतीनंतर मातांनी ही खबरदारी घ्यावी, अन्यथा टाक्यांमध्ये होऊ शकतो संसर्ग

Pregnant Women: प्रसूतीनंतर मातांनी ही खबरदारी घ्यावी, अन्यथा टाक्यांमध्ये होऊ शकतो संसर्ग

3. गरोदरपणात पोटाची समस्या - 

गरोदरपणात तुपाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते, परंतु जर गर्भवती महिलेला पोटदुखी किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तिने तूप खाऊ नये.

3. गरोदरपणात पोटाची समस्या - गरोदरपणात तुपाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते, परंतु जर गर्भवती महिलेला पोटदुखी किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तिने तूप खाऊ नये.

सिझेरियन प्रसूतीमध्ये वेदना होत नाहीत. परंतु, प्रसूतीनंतर अनेक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. विशेषत: टाक्यांची काळजी घ्यावी लागते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 मार्च : गर्भवती महिलांची (Pregnant Women) प्रसूती सामान्य झाली (normal delivery) असेल तर ते त्यांच्यासाठी चांगलं ठरतं, कारण यामध्ये त्यांच्या शरीराला फारशी इजा होत नाही. पण महिलांना नॉर्मल डिलिव्हरीमध्ये खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळं हल्ली अनेक महिला स्वतःहून सिझेरियन डिलिव्हरीचा (Caesarean Delivery) पर्याय निवडत आहेत. अर्थात, सिझेरियन प्रसूतीमध्ये वेदना होत नाहीत. परंतु, प्रसूतीनंतर अनेक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. विशेषत: टाक्यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, थोड्या निष्काळजीपणामुळं त्रास वाढू शकतो आणि टाक्यामध्ये संसर्ग होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी महिलांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली (Women Health Tips) पाहिजे. आंघोळ करताना काळजी घ्या प्रसूतीनंतर टाके बराच काळ पाण्यापासून सुरक्षित ठेवावे लागतात. तज्ज्ञ डॉक्टर महिलेला काही दिवस आंघोळ न करण्यास सांगतात. पण त्यानंतरही आंघोळ करताना टाके घातलेल्या भागाला पाण्यापासून जपावं लागतं. तसंच, टाके घातलेल्या जागेला जोरात हात लावू नये. कॉस्मेटिक वापरू नका टाके घातलेल्या जागेवर कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर न करणं चांगलं. त्यात असलेल्या रसायनांमुळे टाक्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. तसंच, सूज येणं, पू होणं अशा समस्याही होऊ शकतात. या जागेवर तज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधं, पावडर किंवा क्रीम वापरा. हे वाचा -  मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक स्वच्छतेची काळजी घ्या टाके घातलेल्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. आपण हलक्या ओल्या कापडानं ती जागा स्वच्छ करू शकता. मात्र, यासाठी तज्ज्ञांचं मत घेणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या बाबतीत कोणतंही पाऊल उचलू नये. खाज सुटू शकते टाके थोडे कोरडे पडू लागले की कधी कधी खाज सुटते. अशा स्थितीत त्या ठिकाणी नखांनी खाजवण्याची चूक कधीही करू नका. यामुळं टाके उघडू शकतात किंवा संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. हे वाचा -  ज्यांच्यात हे 5 गुण असतात, त्यांच्यावर भाळतात मुली; तुमच्याकडे आहे का हा गुण? हे लक्षात ठेवा सिझेरियन प्रसूतीनंतर दररोज आंघोळ करू नये. परंतु, टाक्यांभोवतीची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. अन्यथा, संसर्गाचा धोका वाढतो. स्वच्छता करताना डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती विविध स्त्रोतातून घेतलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात