जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Parenting Tips : मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक

Parenting Tips : मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक

Parenting Tips : मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक

आपलं मूल एक चांगली व्यक्ती बनावं आणि त्याचं भविष्य (Future) सुरक्षित व्हावं यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. बालपणासह (Childhood) मोठेपणीही चांगली व्यक्ती बनण्यासाठी मुलांना काही साध्या बाबी शिकवणं आवश्यक असतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च :  प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याची आणि संगोपन (Upbringing) करण्याची इच्छा असते. आपलं मूल एक चांगली व्यक्ती बनावं आणि त्याचं भविष्य (Future) सुरक्षित व्हावं यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. बालपणासह (Childhood) मोठेपणीही चांगली व्यक्ती बनण्यासाठी मुलांना काही साध्या बाबी शिकवणं आवश्यक असतं ( Parenting Tips). तुमच्या मुलांना या 5 सवयी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या छोट्याशा सवयींनी लोकांवर तुमची आणि तुमच्या मुलांची चांगली छाप पडेल. तुम्हालाही तुमच्या संगोपनाचा अभिमान वाटेल. कृपया किंवा प्लीज म्हणायला शिकवा लहानपणापासून मुलांना कृपया किंवा प्लीज म्हणायला शिकवा. त्यांना कोणत्या परिस्थितीत कुणाला कृपया किंवा प्लीज म्हणून बोलावं याची सवय लावा. यामुळं त्यांची आणि तुमचीही प्रतिमाचांगली होईल. धन्यवाद (Thank You) म्हणायला शिकवा कोणी काही दिलं किंवा मदत केली तर धन्यवाद किंवा थँक यू म्हणायला मुलांना शिकवा. समोरची व्यक्ती वय आणि स्टेटसमध्ये तुमच्यापेक्षा कमी-जास्त असली तरीही आभार मानणं आवश्यक असल्याचं त्यांना सांगा. हे वाचा -  IPL 2021 : वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट! सॉरी म्हणण्याची सवय लावा अनेकदा कितीही मोठी चूक झाली तरी मुलं सॉरी म्हणायला किंवा माफी मागायला किंवा चूक मान्य करायला तयार नसतात. त्यांना सॉरी म्हणायला कमीपणा वाटतो. त्यांना समजावून सांगा की, त्यांच्या छोट्याशा चुकीबद्दलही सॉरी म्हणायला हवं. यामुळं त्यांची प्रतिमा खराब होणार नाही तर ती सुधारेल. Excuse-Me वापरायला शिकवा मुलांना एक्सक्यूज-मी म्हणण्याची सवय लावा. जेव्हा त्यांना कुणाला काही सांगायचं असेल किंवा कोणाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे असेल तेव्हा त्यांना Excuse-Me म्हणायला शिकवा. यामुळे समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडते. हे वाचा -  Health Tips: कोणत्या टॉनिकपेक्षा कमी नाही गूळ-हरभरा; एकत्र खाण्याने होतो बराच फायदा परवानगी घेण्यास शिकवा लहानपणापासून मुलांना परवानगी घेण्याची सवय लावा. त्यांना सांगा की कुठल्याही ठिकाणी जाऊन कोणतेही काम करण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. तशाच प्रकारे, एखाद्याच्या वस्तूंना स्पर्श करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा चांगल्या सवयींमुळे केवळ मुलाचेच नाही तर पालकांचे देखील कौतुक होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात