मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन प्रयत्न करूनही कमी होत नाही; वाचा या खास टिप्स

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन प्रयत्न करूनही कमी होत नाही; वाचा या खास टिप्स

वजन कमी करण्यासाठी देखील, कीवी खाण्याने होतो. किवीमध्ये भरपूर कमी कॅलरी असतात,त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी देखील, कीवी खाण्याने होतो. किवीमध्ये भरपूर कमी कॅलरी असतात,त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी महिला अनेक पद्धती वापरतात मात्र, तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. अशाच महिलांना आज आम्ही काही टिप्स देणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन कमी करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकता. चला तर जाणून घेऊयात या टिप्स.

मुंबई, 6 जून: प्रेग्नन्सीदरम्यान (weight gain after pregnancy) वजन वाढणं नॉर्मल आहे. मात्र, प्रसूतीनंतर (Weight control After delivery) बरेच प्रयत्न करूनही वाढलेलं वजन कमी होत नाही, याचा महिलांना त्रास होतो. वजन कमी (Weight loss) करण्यासाठी महिला अनेक पद्धती वापरतात मात्र, तरीही त्यांचं वजन कमी होत नाही. अशाच स्त्रियांसाठी काही टिप्स देणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही वजन कमी करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकता. स्तनपान हवंच तुमच्या बाळाला स्तनपान (breast feeding) द्या. आईचं दूध जेवढं बाळासाठी गरजेचं आहे, तेवढंच ते तुमच्यासाठीही आवश्यक आहे. पौष्टिक आहार मिळाल्याने बाळाचं आरोग्य सुधारेल तसंच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. खरं तर, बाळाला स्तनपान दिल्यामुळे बर्‍याच कॅलरी बर्न होतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डाएटिंग आणि जंक फूड खाणं टाळा - प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही डायटिंग (dieting post pregnancy) करण्याचा विचार करत असाल तर थांबा. प्रसूतीनंतरच्या काळात तुमच्या पोषक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत. कमी खाऊन चालणार नाही. पण अशा परिस्थितीत डायटमध्ये तेलकट पदार्थ, जंक फूड (junk food) आणि फास्ट फूडचा (fast food) समावेश टाळा. त्याऐवजी फळं, हिरव्या भाज्या, कडधान्ये, शेंगदाणे, दही, ज्यूस, दूध याचा डाएटमध्ये समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला एनर्जी मिळेल तसेच तुमचा डेली कॅलरी इनटेक कमी होईल, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. हे ही वाचा: आता लॅबमध्ये तयार होतंय आईचं दूध; ब्रेस्ट मिल्कअभावी भुकेला राहणार नाही तान्हुला भरपूर झोप घ्या - बाळाच्या जन्मानंतर आईला शांत, सलग आणि पुरेपूर झोप घेणं शक्य नाही. मात्र, तरीही चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. वेळ मिळेल तेव्हा झोपा. शक्य असल्यास तुम्ही यासाठी घरातील इतर सदस्यांची मदत घेऊ शकता. बाळाला काही तास त्यांच्याजवळ द्या आणि कोणतीही काळजी न करा शांत आणि निवांत झोप घ्या. व्यायाम करायला विसरू नका - प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी व्यायामाची मदत घ्या. परंतु प्रसूतीनंतर लगेच हेवी एक्सरसाईज करण्याऐवजी वॉकिंग, स्ट्रेचिंग योगासारख्या फिजिकल अॅक्टिव्हिटी करा. जर तुमची प्रसूती सिझेरियन झाली असेल तर डॉक्टर, तज्ज्ञ किंवा ट्रेनरच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा - प्रसूतीनंतर नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहा. नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी, नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर रहा. जे लोक आणि ज्या गोष्टी आपल्याला पॉझिटीव्ह वाटतात त्यांच्या संपर्कात रहा. टेन्शन घेऊ नका – प्रसूतीनंतर, बर्‍याच वेळा स्त्रिया बाळाबद्दल, घरातील वातावरण किंवा आरोग्याबद्दल टेन्शन घेतात. हे टेन्शन त्यांचं वजन कमी करण्याऐवजी वाढविण्याचं काम करतं. त्यामुळे कशाचाही तणाव घेऊ नका आणि निवांत रहा.
First published:

Tags: Pregnancy, Pregnent women, Weight loss, Women

पुढील बातम्या