वॉशिंग्टन, 04 जून : नवजात बालकांसाठी (Newborn Baby) आईचं दूध हेच संपूर्ण आहार मानलं गेलं आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मापासून ते बाळ चालतं-बोलतं होईपर्यंत आई त्याला स्तनपान (Breast Feeding) करते. परंतु बर्याच वेळा, योग्य आहार न घेतल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे, आईच्या शरीरात दूध तयार होत नाही, यामुळे पालक बाळांना आईचं दूध कसं मिळेल, यासाठी चिंतेत असतात. कोरोना काळात तर आईच्या दुधाचं महत्त्व अधिकच समजून आलं. कोरोनाने आई हिरावलेले कित्येक तान्हुले आईच्या दुधासाठी भुकेने व्याकूळ झाले होते. तशा बऱ्याच माता या तान्हुल्यांना आपलं दूध पाजण्यासाठी धावल्या. याचदरम्यान एक दिलासादायक बातमी म्हणजे, आता मानवी दूध प्रयोगशाळेत अर्थात विज्ञान प्रयोगशाळेत (Human Breast Milk In A Lab) तयार केलं जाऊ शकतं. हे दूध आईच्या दुधासारखे पोषक असेल, असंही म्हटलं जातं आहे.
या संदर्भात अमेरिकन महिला वैज्ञानिकांनी जगात प्रथमच प्रयोग केले आहेत. त्यांच्या या प्रयोगांमुळे आता आईच्या दुधासारखे पौष्टिक दूध प्रयोगशाळेत तयार करता येईल. शास्त्रज्ञांनी याला 'बायोमिल्क' नाव (BioMilk) दिलं आहे.
बायोमिल्क बनवणाऱ्या या कंपनीच्या सह-संस्थापक आणि मुख्य विज्ञान अधिकारी लैला स्ट्रिकलँड यांनी सांगितलं, त्यांना बायोमिल्क बनवण्याची आयडिया तेव्हा आली जेव्हा त्यांच्या बाळाचा जन्म वेळेआधी झाला.
हे वाचा - लहान मुलांना कोरोना लस देण्यासाठी धडपड; अवघ्या काही तासांतच 3 मोठ्या अपडेट
बाळाचा जन्म होईपर्यंत त्यांच्या शरीरात दूध तयार होण्यास सुरुवात झालेली नव्हती. अशा परिस्थितीत दूध पाजण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांनी बरेच प्रयत्न केले मात्र, त्याचा कोणताच फायदा झाला नाही. स्वतःच्याच या अनुभवापासून प्रेरित होऊन त्यांनी 2013 मध्ये प्रयोगशाळेत मेमरी सेल्स तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर, 2019 मध्ये त्यांनी फूड शास्त्रज्ञ मिशेल इग्गेर यांनाही सोबत घेतलं आणि बायोमिल्क बनवण्यासाठी हा प्रयोग केला. त्यांचा या प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करत हे बायोमिल्क येत्या तीन वर्षांत बाजारात उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा - अरे बापरे! उन्हामुळे चेहऱ्याची अशी भयंकर अवस्था तुम्ही कधीच पाहिली नसेल
माध्यमांच्या वृत्तानुसार, या संदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी सांगितलं की, बायोमिल्कमध्ये असलेल्या पोषक तत्वांची लॅब टेस्टिंगही केली गेली आहे. बायोमिल्कमध्ये आईच्या दुधाप्रमाणेच पोषक द्रव्ये, प्रोटीन, फॅटी अॅसिड, आणि चरबी आवश्यक प्रमाणात राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान, असंही म्हटलं जातं आहे की या बायोमिल्कमध्ये मानवी दुधापेक्षा जास्त पोषक तत्व आहेत.
दुधात अँटिबॉडीज नसल्या तरी बायोमिल्कची न्यूट्रीशनल आणि बायोएक्टिव्ह रचना ( bioactive composition) इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सपेक्षा नक्कीच जास्त आहे, असं स्ट्रिकलँड यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Small baby