मुंबई, 06 डिसेंबर : पांढरे केस काळे करणं असो किंवा सुंदर दिसणं हल्ली बरेच लोक हेअर डाय (Hair Dye) करतात. तुम्हीसुद्धा कधी ना कधी हेअर डाय करतच असाल. पण या हेअर डायचा गंभीर दुष्परिणाम (Hair Dye Bad Effect) झाल्याचं एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे पाहून कदाचित तुम्ही भीतीने हेअर डाय करणंच सोडून द्याल. वेस्ट मिडलँडच्या शेल्डनमध्ये राहणारी 41 वर्षांची अनिता बेन्टन. 2009 सालापासून ती दर सहा ते आठ आठवड्यांनी हेअर डायचा वापर करायची. आधी तिला असा त्रास कधीच झाला नाही. पण यावेळी तिने हेअर डाय लावल्यानंतर तिची अवस्था इतकी भयानक झाली आहे की तिने आता कधीच हेअर डाय वापरायचा नाही अशीच शपथ घेतली आहे. हे वाचा - Yuck! नटूनथटून डेटवर गेली तरुणी; पोटात कळ आली आणि जमिनीवरच केली शी 16 ऑक्टोबरला तिने आपल्या केसांना हेअर डाय लावलं आणि त्यानंतर दहा मिनिटांनी तिच्या डोक्यात जळजळ होई लागली. दुसऱ्या दिवशी तिचे केस डोक्याला पूर्णपणे चिकटले होते. त्यामुळे ती वेदनेने ओरडत होती. पुढील दोन दिवसांत तिचा चेहरा सूजला. चेहऱ्यावर इतकी सूज आली की तिचे डोळे बंद झाले होते. ज्यामुळे तिला काही दिसतही नव्हतं. आठवडाभर तिने कामावर सुट्टी घेतली.
द मिरर च्या रिपोर्टनुसार हेअर डाय लावल्यानंतर अनिताच्या चेहऱ्यावर सूज आली. डोकं आणि त्वचेवर लाल, गाठीसारखे पुरळ आले. तिचे डोळे सुजले. चार दिवस ती तात्पुरतील आंधळी झाली होती त्यामुळे ती खूप घाबरली. तिचे डोळे पूर्णपणे खराब झाले अशीच भीती तिला वाटू लागली. हे वाचा - मेंदीमध्ये या गोष्टी मिसळून करा वापर; केसांच्या अनेक समस्या होतील गायब तिचा चेहरा इतका भयंकर झाला होता की तिचे वडीलही तिला ओळखत नव्हते. तिच्या बॉसला तर तिला कुणीतरी मारहाणच केली असं वाटू लागलं. तिला बॉसला आपल्या अॅलर्जीच्या औषधांचे फोटो पाठवावे लागले. लोकांनी हेअर डायचा वापर करण्यापूर्वी अॅलर्जी अलर्ट टेस्ट करावी असा सल्लाही दिला आहे.