मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Growth Tips : मेंदीमध्ये या गोष्टी मिसळून करा वापर; केसांच्या अनेक समस्या होतील गायब

Hair Growth Tips : मेंदीमध्ये या गोष्टी मिसळून करा वापर; केसांच्या अनेक समस्या होतील गायब

केसांच्या वाढीसाठी मेंदी हा एक प्राचीन आणि अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केस गळती रोखण्यासाठी मोहरीचे तेल आणि मेंदी फायदेशीर आहे. केसांना मेंदी लावण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया.

केसांच्या वाढीसाठी मेंदी हा एक प्राचीन आणि अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केस गळती रोखण्यासाठी मोहरीचे तेल आणि मेंदी फायदेशीर आहे. केसांना मेंदी लावण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया.

केसांच्या वाढीसाठी मेंदी हा एक प्राचीन आणि अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केस गळती रोखण्यासाठी मोहरीचे तेल आणि मेंदी फायदेशीर आहे. केसांना मेंदी लावण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 05 डिसेंबर : आजकाल लांब केस ठेवण्याची फॅशन चालू आहे. प्रत्येकाला लांब केस हवे असतात. पण केसांची योग्य काळजी न घेतल्याने केसांच्या समस्या चालू होतात. आरोग्य तज्ज्ञांचे मते, वाढते प्रदूषण, धकाधकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या केसांचे खूप नुकसान होते, त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मेहंदी केसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ (Hair Growth Tips) शकते. केसांच्या समस्या 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार, अलिकडे कमी वयातील लोकांनाही केसांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यात केस पांढरे होणे, केस पातळ होणे, जास्त केस गळणे, कोरडे आणि खराब झालेले केस आणि टक्कल पडणे इ. समस्या आहेत. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची (Hair care home remedies) मदत घेऊ शकता. मेहंदी उपयोग केसांच्या वाढीसाठी मेंदी हा एक प्राचीन आणि अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. केस गळती रोखण्यासाठी मोहरीचे तेल आणि मेंदी फायदेशीर आहे. केसांना मेंदी लावण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया. कोरड्या केसांसाठी केसांना मेंदी लावल्याने केस मऊ होतात. यासाठी तुम्ही मेंदीमध्ये अंडी वापरू शकता. या मिश्रणामुळे केस अधिक चमकदार होतात. हे करण्यासाठी, मेहंदीची पाने उकळवा. आता त्यात मेंदी पावडर घाला. आता हे केसांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या. 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवा. 1. केसांच्या वाढीसाठी सर्वप्रथम मेहंदीची पाने चांगली बारीक करून घ्या. आता त्यात जिंजीचे तेल मिसळा आणि केसांना लावा. तासभर राहू द्या. तुमचे केस मजबूत आणि लांब होण्यास पोषण मिळेल. हे वाचा - Home Loan : घर घेण्यासाठी होम लोन करताय? कोणती बँक सर्वात स्वस्त लोन देते चेक करा 2. कोंडा दूर करण्यासाठी केसांमध्ये कोंड्याची समस्या असल्यास ते कमकुवत होऊन तुटण्यास सुरुवात होते. त्यामुळे टाळूला खाज येण्याची समस्याही सुरू होते आणि त्यामुळे केस गळती वाढते. यासाठी मोहरीच्या तेलात मेंदी आणि भिजवलेले मेथी दाणे मिसळून पेस्ट तयार करा. हे केसांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या. त्यानंतर अर्ध्या तासानंतर शॅम्पूने धुवा. हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल 3. केस गळतीसाठी या धकाधकीच्या जीवनात केस गळण्याची समस्या खूप सामान्य बनली आहे. केस गळती थांबवण्यासाठी मोहरीच्या तेलात मेंदी पावडर मिसळा ही पेस्ट केसांना चांगली लावा. यामुळे केस गळणे कमी होईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health Tips, Woman hair

पुढील बातम्या