नवी दिल्ली, 13 मे: कोरोना विषाणूपासून (Corona Virus) बचाव करण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू आहे. भविष्यातील रोगाचा धोका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहेत. दरम्यान, इटालियन संशोधकांनी या आजारानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोविड-19चा संसर्ग (Corona Infection) झाल्यानंतर कोरोनाविरुद्धच्या अँटीबॉडीज आठ महिन्यांपर्यंत रुग्णाच्या रक्तात राहतात. रोगाची तीव्रता, रुग्णाचं वय किंवा इतर आजार असतानाही या अँटिबॉडीज रक्तात आढळतात, असं निरीक्षण मिलानच्या सॅन राफेल रुग्णालयाने नोंदविले आहे. जोपर्यंत कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडीज शरीरात राहतील, तोपर्यंत या विषाणूचा धोका नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इटलीच्या ISS नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने संशोधक यावर काम करत आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या 162 रुग्णांचा त्यांनी अभ्यासात समाविष्ट केले होते. त्यांना गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान अतिदक्षता विभागात ICU ठेवलं गेलं होतं. त्यांचे रक्ताचे नमुने प्रथम मार्च आणि एप्रिलमध्ये घेण्यात आले आणि त्यानंतर जे लोक जिवंत होते, त्यांचे रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. यापैकी जवळपास 29 रुग्णांचा मृत्यू झाला. ISS शी सामायिक केलेल्या निवेदनात संशोधकांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर या रुग्णांच्या शरीरात रोगाविरोधातील अँटिबॉडीज असल्याचे आढळले. यापैकी केवळ तीन रुग्णांच्या शरीरात दीर्घकाळापर्यंत अँटीबॉडीज राहिलेल्या नव्हत्या. हा अभ्यास ‘नेचर कम्युनिकेशन्स सायंटिफिक जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यात, संशोधकांनी कोरोना विषाणू संसर्गातून बरे होण्याबरोबरच विकसित होणाऱ्या अँटीबॉडीजलाही महत्त्व दिले आहे. हे वाचा - कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, कोरोना रुग्णांनी सहा महिन्यांनंतर वॅक्सिन घ्यावं, NTAGI चा सल्ला कोरोना संसर्ग झाल्यानंतर गंभीर स्थितीत गेलेल्या रुग्णांबद्दलही संशोधकांनी विशेष माहिती दिली. ज्या रुग्णांमध्ये संक्रमणाच्या 15 दिवसांच्या आत अँटीबॉडीज झाल्या नाहीत, त्यांना कोविड-19चा अधिक घातक प्रकार होण्याचा धोका जास्त असतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या अभ्यासात दोन तृतीयांश पुरुषांचा समावेश होता. त्यांचे सरासरी वय 63 होते. यापैकी जवळपास 57 टक्के रुग्ण असे होते, ज्यांना आधीपासूनच काही आजार होते. ते मुख्यतः उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्ण होते. आपल्याला जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीची आवश्यकता असते, तेव्हा शरीरात नवीन अँटीबॉडीज कधी आणि कशा तयार करता येतील हे समजणारी यंत्रणा शरीरात आधीपासूनच असते. अँटीबॉडीज असे प्रथिने आहेत जी बी पेशींमध्ये (B cells) विषाणूंना जखडून नष्ट करतात. हे वाचा - अक्षय तृतीयेदिवशी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडून गिफ्ट, खात्यात पाठवले जाणार 19000 कोटी विषाणूचा पहिल्यांदा संसर्ग झाल्यावर शरीर त्याविरोधात सहजपणे लढायला सक्षम नसते. परंतु, दुसर्यांदा संसर्ग झाल्यावर शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा त्यास सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित असते आणि आधीपेक्षा चांगली प्रतिपिंडे (Antibodies) तयार करते, असे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतातील बरीच राज्ये हादरली आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पवित्र गंगा नदीतही मृतदेह वाहताना दिसतात. संक्रमित लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नद्यांमध्ये टाकले जात आहेत. बिहारमध्ये अशी प्रकरणे सातत्याने पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







