टोरंटो, 25 जानेवारी : तसं स्वप्नं (dream) पाहून ती साकार करण्याच्या दिशेनं प्रत्येक जण प्रयत्न करतो. पण झोपेत पडलेल्या स्वप्नांना (sleep dream) खरं मानून ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारे कमीच. झोपेत पडणारी स्वप्नं खरी असतातच असं नाही. त्यामुळे कुणी या स्वप्नांकडे फारसं लक्ष देत नाही किंवा सरळ दुर्लक्षच केलं जातं. पण कॅनडातील एका महिलेनं तसं केलं नाही तिनं झोपेत पडलेल्या स्वप्नाला गांभीर्यानं घेतलं त्यामुळे आज ती करोडपती झाली आहे. विशेष म्हणजे हे स्वप्नं तिला पडलेलं नव्हतं तर तिच्या नवऱ्याला पडलं होतं. नवऱ्याच्या स्वप्नामुळे आज तिचं नशीब फळफळलं आहे. कॅनडातील (canada) टोरंटोमध्ये राहणारी 57 वर्षांची डेंग प्रवतुडोम. कोरोना महासाथीदरम्यान तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. पण त्याच काळात तिच्या नशीबानं साथ दिली. तिच्या नवऱ्यानं 20 वर्षांपूर्वी एक स्वप्नं पाहिलं आणि ते प्रत्यक्षात साकार झालं आहे. आज तकनं सीएनएनचा हवाला देत दिलेल्या रिपोर्टनुसार डेंग प्रवतुडोमनं सांगितलं, तिच्या नवऱ्यानं 20 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नात लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी काही खास नंबर्स त्याला स्वप्नात दिसले आणि याच नंबर्समुळे महिला लॉटरी जिंकली आहे. हे वाचा - हरता हरता विजयाला गवसणी, अखेरच्या क्षणाला तिनं कशी पलटवली बाजी पाहा Video 20 वर्षांपासून डेंग तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात जे नंबर्स दिसले होते. त्याच नंबर्सची लॉटरी खरेदी करायची. एक-दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षे ती लॉटरी तिकिट खरेदी करत होती. तब्बल दोन दशकांनंतर का होईना तिच्या नवऱ्याचं स्वप्न खरं ठरलं. कॅनडातील ओन्टरियो लॉटरी अँड गेमिंगनं डेंग 60 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 437 कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्याचं सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे ती लॉटरी जिंकली ही खूशखबर तिला सर्वात आधी आपल्या पतीकडूनच मिळाली. एका व्हर्च्युअल प्रोग्राममध्ये तिला चेक देण्यात आला. हे वाचा - GF च्या आईबाबांना पाहून फुटला घाम; तिच्या घरातून धूम ठोकली, थेट गाठलं पाकिस्तान डेंग म्हणाली, 437 कोटी रुपये जिंकल्याचं ऐकून मी खूप आनंदी झाले. मला रडूदेखील आलं. सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता. या लॉटरीच्या पैशांतून मी आता घर खरेदी करणार आहे आणि संपूर्ण जग फिरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.