मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हरता हरता विजयाला गवसणी, अखेरच्या क्षणाला तिनं कशी पलटवली बाजी पाहा Video

हरता हरता विजयाला गवसणी, अखेरच्या क्षणाला तिनं कशी पलटवली बाजी पाहा Video

हरता हरता तिनं विजय कसा खेचून आणला तो एकदा पाहाच.

हरता हरता तिनं विजय कसा खेचून आणला तो एकदा पाहाच.

हरता हरता तिनं विजय कसा खेचून आणला तो एकदा पाहाच.

मुंबई, 24 जानेवारी : हार करत जितने वाले को बाजीगर कहते हैं, शाहरूख खानच्या बाजीगर फिल्मचा डायलॉग प्रसिद्ध आहेच. हाच डायलॉग खरा करून दाखवला आहे तो एका महिला अॅथलेटनं. जिनं हरता हरता विजय आपल्या खिशात घातला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फिल्ममध्ये अशी ऐन क्षणाला अशी बाजी पलटताना तुम्ही पाहिलं असेल, पण प्रत्यक्षात असं पहिल्यांदाच पाहत असाल. @RexChapman या ट्विटर अकाऊंटवरून रेसचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिला खेळाडूंची रेस सुरू आहेत. त्यामध्ये एक खेळाडू इतकी मागे राहते की तिच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचीही अपेक्षा नव्हती. पण अखेरच्या क्षणी तिनं बाजी पलटवली आणि तिसरा, दुसरा नाही तर थेट पहिलाच क्रमांक पटकावला आहे. Ziyah Holman असं या अॅथलेटचं नाव आहे. व्हिडीओत पाहू शकता. सुरुवातीला ती इतर सर्व खेळाडूंच्या मागे आहे. थोड थोडकं नाही तर खूपच अंतर तिला पार करायचं होतं. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या इतक्या पुढे जाताना ती पाहते आणि अक्षरश: धावतच सुटते. ती अशी धावते अशी धावते की तिच्यापासून दूर गेलेल्या खेळांडूंना ती गाठतेच. हे वाचा - बास्केटबॉल खेळता खेळता नेटवर लटकला आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO तिच्या वेगामुळे तिथं उपस्थित असलेल्या तिच्या चाहत्या प्रेक्षकांनाही स्फूर्ती चढते. ते मोठमोठ्यानं ओरडू लागतात.  पुढे पाहाल तर फक्त या खेळाडूंपर्यंत ती पोहोचत नाही तर त्यांच्या पुढेही जाते आणि अगदी शेवटच्या क्षणी ती बाजीगर बनते. हरता हरता कसं जिंकता येतं, हेच या महिला खेळाडूनं दाखवून दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. हे वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO हा व्हिडीओ म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा देणाराच ठरला आहे. आयुष्यातील छोट्या छोट्या अपयशांनीही खचून जाणाऱ्यांमध्ये एक नवीन आशा निर्माण करणारा, नवीन उमेद देणारं हे दृश्यं आहे. आपण कितीही हरत असलो तरी ती हार पत्करू नका. प्रयत्न करण्याचे सोडू नका. प्रयत्न कराल तर विजय तुमचाच आहे. इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे. हेच या व्हिडीओतून दिसून येतं.
First published:

Tags: Social media viral, Sport, Viral, Viral videos

पुढील बातम्या