मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डोक्यावर टब, हातात बादली; बाईकला किक मारून पाण्यातून चालली ही नार; पाहा VIDEO

डोक्यावर टब, हातात बादली; बाईकला किक मारून पाण्यातून चालली ही नार; पाहा VIDEO

या महिलेला पाहून प्रत्येक जण सुपरवुमन, वंडरवुमन अशीच प्रतिक्रिया देत आहे.

या महिलेला पाहून प्रत्येक जण सुपरवुमन, वंडरवुमन अशीच प्रतिक्रिया देत आहे.

या महिलेला पाहून प्रत्येक जण सुपरवुमन, वंडरवुमन अशीच प्रतिक्रिया देत आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 16 जून : डोक्यावर हंड्यावर हंडे, एका हाताच्या काखेत हंडा, दुसऱ्या हातात कळशी... असं पाणी भरताना गावातील अनेक महिलांना आपण पाहिलं आहे. याबाबतील महिलांना कुणीच मात देऊ शकत नाही. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या महिलेनं आपल्या डोक्यावर टब घेतला आहे, एका हातात बादली घेतली आहे आणि त्यानंतर ठुमकत नव्हे तर चक्क बाईकवरून (Woman driving bike in water) बसून ही नारीनं वाट धरली. डोक्यावर टब, एका हातात बादली घेऊन बाईकवरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण झाला आहे. या महिलेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला एका छोट्याशा नदीजवळ आहे. तिने तिथं भांड्यांनी भरलेला टब आपल्या डोक्यावर घेतला. त्यानंतर एका हातात बादली घेतली आणि दुसऱ्या हातात बॅग घेतली. यानंतर तिच्याजवळ असलेल्या बाईकवर बसून किक मारून ती आपल्या मार्गाला लागली. तिने चक्क पाण्यातून ही बाईक चालवली आहे. हे वाचा - VIDEO - जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट पाण्याने भिजलेल्या रोडवर बाईक चालवताना अनेक पुरुषांच्या हातूनही बाईक निसटते. अशाच या महिलेनं तर चक्क पाण्यातूनच बाईक चालवली आहे. त्यात तिच्या अंगावर आधीच वजन आहे. त्यात तिच्या डोक्यावरील टब अजिबात हलला नाही आहे. तिच्या दोन्ही हातातील एकही वस्तू पडली नाही. ना पाण्यात बाईक घसरली आहे. त्यामुळे या महिलेच्या बॅलेन्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे. हे वाचा - VIDEO : बूट चोरण्यासाठी मेहुण्या लागल्या अशा मागं, मग दाजीबा झाले मंडपातच आडवे डॉ. अजयिता या ट्विटर युझरने आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विविध कौशल्य असलेली महिला असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनी या महिलेचं कौतुक केलं आहे. कुणी तिला सुपरवुमन म्हटलं आहे, तर कुणी वंडरवुमन. तर अनेकांनी  नारी शक्ती म्हणून या महिलेला सलामही केला आहे.
First published:

Tags: Viral, Viral videos, Woman, Woman biker

पुढील बातम्या