VIDEO : बूट चोरण्यासाठी मेहुण्या लागल्या अशा मागं, मग दाजीबा झाले मंडपातच आडवे

बूट पळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेहुण्यांना (Jijaji Ka Juta) रोखण्यासाठी नवरदेवानं नामी शक्कल लढवली आणि बूट पायाच्यामध्ये पकडून मंडपात आडवा झाला.

बूट पळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेहुण्यांना (Jijaji Ka Juta) रोखण्यासाठी नवरदेवानं नामी शक्कल लढवली आणि बूट पायाच्यामध्ये पकडून मंडपात आडवा झाला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जून : लग्नामध्ये नवरदेवाचा बूट चोरण्याची प्रथा जवळपास सर्वत्र दिसून येते. बूट पायात घालण्यासाठी मग नवरदेवाला पैसे द्यावे लागतात. अनेक लग्नांमध्ये या कार्यक्रमावरून चांगला गोंधळ उडाल्याचे दिसून येते. बऱ्याच लग्नांमध्ये हा बूट चोरण्याचा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहतो. बूट कसा पळवला आणि मग नवरदेवाला त्यासाठी काय-काय करावं लागलं याच्या आठवणी नंतर कायम राहतात, अशाच एका लग्नातील नवरदेवाच्या लग्नातील बूट पळवापळवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media viral) चांगलाच व्हायरल होत आहे. बूट पळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेहुण्यांना (Jijaji Ka Juta) रोखण्यासाठी नवरदेवानं नामी शक्कल लढवली आणि बूट पायाच्यामध्ये पकडून मंडपात आडवा झाला. बूट वाचवण्यासाठी नवरदेवाची जमिनीवर लोळण
    इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की पहिल्यांदा मेव्हणी येऊन शूज घेण्याचा प्रयत्न करू लागते, त्यावर वराचे मित्र आणि कुटुंबीय तिला रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, त्यांच्याही हातून बूट निसटेल असे वाटू लागल्यानंतर नवरदेवही आक्रमक होत, बूट पायात पकडून मंडपातच आडवा झाला. त्याचा हा प्रकार पाहून वधूसुद्धा हसू लागते. मात्र, तरीही नवरदेव मागं हटत नाहीत आणि बूट पकडून ठेवतात. इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. हे वाचा - या सरकारी बँकेच्या नेट बँकिंगमध्ये गोंधळ, ग्राहकांच्या विविध तक्रारी; पैसे ट्रान्सफर करण्याआधी वाचा बँकेने काय म्हटलं ट्रेंडिग दुल्हनिया नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लोकांचीही या व्हिडिओला चांगली पसंती मिळाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून काहींनी यावर गंमतशीर कमेंटही केल्या आहेत. एकानं नवरा खूपच कंजूष आहे असं म्हणत पैसे वाचवण्यासाठी तो मंडपात आडवा झाला असं म्हटलं आहे तर एकानं सर्वात चांगला उपाय शानदार दुल्हेराजा असं म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: