• Home
 • »
 • News
 • »
 • heath
 • »
 • 30 वर्षांनी उघडलं महिलेचं तोंड; परदेशातील डॉक्टरांनी हात वर केले, अखेर भारतीय डॉक्टरांनीच केली कमाल

30 वर्षांनी उघडलं महिलेचं तोंड; परदेशातील डॉक्टरांनी हात वर केले, अखेर भारतीय डॉक्टरांनीच केली कमाल

30 वर्षांपासून तोंड न उघडणाऱ्या या महिलेची शस्त्रक्रिया करणं खूपच जोखमीचं होतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 मार्च : 30 वर्षांची आस्था मोंगिया (Aastha Mongiya) गेल्या 30 वर्षांपासून ती नीट खाऊसुद्धा शकली नाही. तिला बोलायलासुद्धा त्रास होत होता.  तिच्या तोंडात तिचा हातही जात नव्हता. इतकी वर्षे ती द्रव पदार्थांवर जगते आहे. अखेर 30 वर्षांनी ती आपलं तोंड उघडू शकते आणि ही कमाल केली आहे ती भारतीय डॉक्टरांनी. आस्था मोंगियाच्या डोक्यातील कवटीचं हाड जबड्यासोबत जोडलेलं होतं. त्यामुळे जन्मापासून ती तिचं तोंड नीट उघडू शकत नव्हती. तिच्यावर शस्त्रक्रिया करणं हाच एक पर्याय होता. तिच्या कुटुंबाने तिला अनेक रुग्णालयात नेलं. फक्त भारतातीलच नव्हे तर ब्रिटन आणि दुबईतील नामांकित रुग्णालयातही तिला नेण्यात आलं. पण परदेशातील डॉक्टरांनी मात्र हात वर केले. आस्थाची शस्त्रक्रिया करण्यास परदेशातील बड्या बड्या डॉक्टरांनी नकार दिला. कारण तिच्यावरील शस्त्रक्रिया खूपच जोखमीची होती.  थोडी जरी चूक झाली असती तरी तिचा मृत्यू होऊ शकला असता. हे वाचा - वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL पण भारतीय डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आलं. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, आस्था मोंगिया खूपच कमी तोंड उघडी शकत होती. तिच्या तोंडात तिचा हातही जात नव्हता.  तोंड पूर्ण उघडत नसल्याने तिच्या तोंडाची स्वच्छताही तिला नीट करता येत नव्हती. तिच्या दातांमध्ये इन्फेक्शन झालं होतं आणि सर्व दात खराब झाले होते. सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. रुग्णालयातील वरिष्ठ प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर राजीव आहुजा यांनी सांगितलं, मोंगियाचं तोंड आता तीन सेंटीमीटर आणखी उघडू शकतं.  सामान्यपणे व्यक्तीचं तोंड हे चार ते सहा सेंटीमीटरपर्यंत उघडू शकतो. पुढील काही दिवसांत आस्थाचं तोंड आणखी उघडेल, असंही डॉ. आहुजा यांनी सांगितलं. हे वाचा - कोरोना महासाथीचा असाही परिणाम; तुमच्यासोबतही असंच घडतंय का ते पाहा अखेर आस्था आता नीट खाऊ शकते, बोलू शकते. त्यामुळे तिला खूपच आनंद झाला आहे. मी आता माझं तोंड उघडू शकते आणि कोणत्याही समस्येशिवाय हवं ते खाऊ शकते.  माझ्यासाठी खरंतर हा चमत्कारच आहे, असं आस्था म्हणाली.
  Published by:Priya Lad
  First published: