पोर्टो नोव्हो, 13 एप्रिल : प्रेग्नन्सीत (Pregnancy) महिलांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यांपासून ते नवव्या महिन्यापर्यंत. जसजसे महिने वाढतात तसतसं महिलांना अधिकच खबरदारी घ्यावी लागते. अगदी शरीराची हालचाल करतानाही लक्ष ठेवावं लागतं. जास्त वजन उचलू देत नाही. पण एका महिलेने मात्र प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात असं काही केलं आहे, की व्हिडीओ पाहूनच प्रत्येकाला धक्का बसेल. 8 महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या नायजेरियातील (Nigeria) या महिलेनं चक्क स्पर्धेत (eight months pregnant woman take part in sports) भाग घेतला. या स्पर्धेत तिने ताइक्वांडोचं (taekwondo) प्रात्यक्षिक केलं. फक्त तिने केलं नाही तर यामध्ये तिनं गोल्ड मेडलही जिंकलं. या प्रेग्नंट महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नॅशनल स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये (National Sports Festival ) आपल्या ट्विटर अकाऊंटवर या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
An inspiring outing by heavily pregnant Aminat Idrees who won a gold medal for Lagos at the ongoing National Sports Festival in Benin, Edo State.
— National Sports Festival 2020 (@nsf_edo) April 5, 2021
Aminat Idrees who is 8 months pregnant won gold in the Mixed Poomsae category in Taekwondo pic.twitter.com/rr4fxJCfMs
नायजेरियात राहणारी 26 वर्षांची खेळाडू अमीनत इदरीस. इडो स्टेटमध्ये बेनिनमध्ये झालेल्या नॅशनल स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये (National Sports Festival ) ताइक्वांडोत तिने सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. मिक्स्ड पोमासे वर्गात तिनं विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेतील तिचा व्हिडीओ पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटलं आहे. व्हिडीओत पाहू शकता अमीनत प्रेग्नंट आहे. तिचं बेबी बम्प स्पष्टपणे दिसतं आहे. ती आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. असं असतानाही तिने स्पर्धेत भाग घेतला आणि ती कशा पद्धतीने मुव्ह्ज करते आहे ते पाहू शकता. अगदी सामान्य माणसांनासुद्धा जमणार नाही ते तिनं प्रेग्न्सीच्या आठव्या महिन्यात करून दाखवलं आहे. हे वाचा - महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; VIDEO पाहताच म्हणाल, लय भारी! द सनच्या रिपोर्टनुसार ती एकमेव खेळाडू आहे, जिनं सर्वात जास्त मेडल जिंकले आहे. इतर काही नॉन कॉम्बेट वर्गातही तिला पदकं मिळाली आहे. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरते. अमीनत या स्पर्धेची प्रतीक्षा करत होती. तिला या स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं. पण ती प्रेग्नंट राहिली. त्यामुळे आता आपण खेळू शकणार नाही, असंच तिला वाटलं. मग तिने डॉक्टरांना भेटली आणि स्पर्धेत सहभागी होण्याबाबत आपली इच्छा व्यक्त करत त्यांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तिला परवानगी दिली. हे वाचा - 73 वर्षीय आजीबाईंना करायचं आहे लग्न, जोडीदाराच्या शोधात दिलेली जाहिरात VIRAL अमीनतने सांगितलं, प्रेग्नंट होण्यापूर्वी मी ट्रेनिंग घ्यायची. प्रेग्नन्सीनंतरही मला काही फरक वाटला नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यानुसार आयोजकांनीही खेळायला परवानगी दिली. काही कालावधी ट्रेनिंग घेतल्यानंतर मी स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. प्रेग्नन्सीदरम्यान टुर्नामेंटमध्ये भाग घेणं जास्त धोकादायक नव्हतं, आपल्याला काहीच समस्या झाली नाही. माझ्यासाठी हे मोठं यश आणि एक सुखद अनुभव आहे, असं अमीनतने सांगितलं.