• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे बापरे! जंगल सफारी करताना चक्क गाडीतच घुसला सिंह आणि... Shocking Video Viral

अरे बापरे! जंगल सफारी करताना चक्क गाडीतच घुसला सिंह आणि... Shocking Video Viral

सिंह गाडीत घुसताच जे घडलं (lion entered in vehicle) ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल

 • Share this:
  मुंबई, 12 एप्रिल : जंगल सफारी करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये फिरताना गाडीसमोर अचानक सिंह आला तरी अंंगाला घाम फुटतो. सिंह (Lion) गाडीच्या आजूबाजूने फिरू लागला तर मग नाही म्हटलं तरी आपला अर्धा जीव तसाच जातो. पण जरा विचार करा जर का सिंह गाडीतच (Lion entered in Vehicle) घुसला तर... असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल. सोशल मीडियावर या सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. डेली मेलचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहताच तुमच्या हृदयाची धडधड वाढेल. व्हिडीओत पाहू शकता, पर्यटक असलेली गाडी जाताना रस्त्यात एक सिंह बसलेलादिसतो. गाडीचालक सिंहासमोरच गाडी थांबवतो आणि सिंह चक्क गाडीतच घुसतो. हे वाचा - VIDEO - जंगलात असं काही घडलं की जंगलाच्या राजाचीही झोप उडाली; पाहताच भरली धडकी ड्रायव्हरच्या अंगावर तो जातो आणि त्याला गोंजारू लागतो. ड्रायव्हर थोडाफार घाबरलेलाही दिसतो. तो सीटवरून सरकत सरकत खाली येतो. सिंह पूर्णपणे त्याच्या सीटवर उभा राहतो. मग ड्रायव्हर गाडीतून बाहेरच पडतो. त्यानंतर पाठोपाठ सिंहसुद्धा गाडीतून बाहेर येतो. ड्रायव्हर पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. सुदैवाने सिंह कुणालाच काही करत नाही असंच आपल्याला वाटतं इतक्यात तो पुन्हा गाडीत शिरतो. आता पर्यटकांच्या अंगावर तो जातो. पर्यटकांनासुद्धा तसंच गोंजारतो जसं त्या ड्रायव्हरला. पर्यटकसुद्धा आपल्या हातात मोबाईल घेऊन हा अद्भुत असा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतात. थोड्या वेळान सिंह पुन्हा गाडीबाहेर येतो. हे वाचा - गेंड्याचा पाठलाग करत होती कार, संतापलेल्या जनावरानं काय केलं? पाहा VIDEO हुश्श आता मात्र गाडी सुरू होते. सिंह त्या गाडीकडे पाहत राहतो. सुदैवाने तो कुणालाच काही करत नाही. व्हिडीओ संपूर्ण पाहिल्यानंतर कुठे जिवात जीव येतो.
  First published: