• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Shocking! Appendix चं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं चक्क बाळ; आई झालेल्या महिलेलाही बसला धक्का

Shocking! Appendix चं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं चक्क बाळ; आई झालेल्या महिलेलाही बसला धक्का

आपण प्रेग्नंट आहोत याची कल्पना या महिलेलाही नव्हती. रुग्णालयात गेल्यावर 48 तासांतच तिने बाळाला जन्म दिला.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : चक्कर येणं, मळमळणं, उलटी होणं अशी प्रेग्न्सीची लक्षणं सुरुवातीला दिसतात. त्यानंतर काही महिन्यांनी पोट वाढू लागतं म्हणजे बेबी बम्प दिसू लागतं आणि 9 महिन्यांनी बाळाचा जन्म होतो. एक महिला आई होण्याचा हा अनुभव बाळ प्रत्यक्षात हातात येण्याआधी नऊ महिने त्याला पोटात ठेवून अनुभत असते. पण यातील काहीच न होता अचानक बाळ झालं तर... साहजिकच मोठा बसेल (Shocking Pregnancy News). असाच धक्का बसला तो अमेरिकेतील एका कपलला. ओहियोतील (Ohio) ब्रुकफिल्डमध्ये  राहणारी 19 वर्षांची नादिया (Nadia) रुग्णालयात अॅपेंडिक्सचं (Appendix) ऑपरेशन करायला गेली आणि रुग्णालयातून घरी परतली ती आपल्या बाळाला हातात घेऊन. तिच्या पोटात बाळ होतं, याची कल्पना तिलासुद्धा नव्हती. ना तिचं वजन वाढलं होतं, ना पोट वाढलं होतं. नादियाच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. तिचा बॉयफ्रेंड ब्रॅडला वाटलं की तिला अॅपेंडिक्स झाला असावा म्हणून तो तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेला. तिथं गेल्यावर नादिया प्रेग्नंट असल्याचं समजलं. 48 तासांतच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे वाचा - आईने बाळाला टॉवेलऐवजी बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी नादियाने सांगितलं, ही प्रेग्नन्सी तिच्यासाठी धक्कादायक होती. आपण प्रेग्नंट आहोत हे नऊ महिन्यात आपल्याला समजलंच नाही. जेव्हा रुग्णालायत डॉक्टरांनी मला मी प्रेग्नंट असल्याचं सांगितलं तेव्हा सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही. ज्याला ती अॅपेंडिक्समुळे होणाऱ्या वेदना समजत होती ते खरंतर लेबर पेन म्हणजे प्रसूती वेदना हत्या, असं नर्सने तिला सांगितलं. रुग्णालयात  तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतरही काही महिने ती आई झाली आहे, हे तिला वाटतच नव्हतं. हे वाचा - गरोदर काळात अंगावर खाज सुटण्याची समस्या सतावतेय? हे घरगुती उपाय करून पाहा नादिया आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहते. ती बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घ्यायची. ज्यामुळे पीरिअड्स न येणं हे तिच्यासाठी नवं नव्हतं. एप्रिल 2020 मध्येच नादिया प्रेग्नंट धाली होती. त्यावेळी तिला मासिक पाळी आली नाही. पण औषधांमुळे असं झालं असावं असं तिला वाटलं. त्यानंतर तिला पोटात, पाठीत वेदना व्हायच्या पण तिचं वजन वाढलं नाही. तिने आपल्या या वेदना अॅपेंडिक्समुळे असाव्यात असं समजलं. पण रुग्णालयात गेल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं समजलं आणि दोन दिवसांत तिने मुलाला जन्म दिला.
  Published by:Priya Lad
  First published: