नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : गर्भवती (pregnancy) महिलांच्या त्वचेवर खाज सुटणे ही जवळपास सामान्य बाब आहे. गरोदर काळात पोट वाढत असल्याने शरीराची त्वचा ताणली जाते. ज्यामुळे गरोदर महिलांच्या शरीरावर खाज सुटण्याची समस्या सुरू होते. त्वचेवर खाज सुटणे हे सामान्य असले तरी जास्त खाज उटत असेल किंवा व्रण येत असतील तर अडचणी वाढू शकतात. गर्भवती महिलेच्या शरीराच्या कोणत्या भागात खाज सुटेल याबाबत काहीच सांगता येत नाही. पाय, पाठ, हात, तळवे इत्यादींमध्येही खाज सुरू होते.
खाज सुटणे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात (Remedies to reduce itching during pregnancy) -
नारळाचे तेल :- गर्भवती महिलेचे शरीर कोरडे झाल्यामुळे खाजत असेल तर नारळाचे तेल लावल्यास आराम मिळतो. खाज सुटण्यासाठी नारळ तेल चांगले आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे तेल तुम्ही कापसाच्या मदतीने खाजलेल्या भागात लावू शकता.
हे वाचा - विकृतीचा कळस! नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोच्या आत्महत्येचा VIDEO, सोशल मीडियावर अपलोडही केला
पेट्रोलियम जेली :- खाज सुटण्यावर पेट्रोलियम जेली देखील एक चांगला उपाय आहे. यात कोणतीही रसायने नसतात. त्यामुळे खूप आराम मिळू शकतो, हे केवळ खाज सुटण्यापासून आराम देत नाही तर आपली त्वचा मऊ ठेवते.
लिंबाचा रस :- खाज सुटत असते तेव्हा तेलामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि खाजलेल्या भागात लावा. यामुळे तुम्हाला खाज सुटण्यापासून आराम मिळेल. खाज सुटण्यावर लिंबू एक अतिशय प्रभावी उपचार आहे.
तुळशीची पाने : - खाज सुटलेल्या भागावर तुळशीची पाने किंवा त्यांचा रस लावल्याने आराम मिळतो. कारण तुळशीमध्ये थायमॉल जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे खाज कमी होऊ शकते. आंघोळीच्या पाण्यात तुळशीचा रस घालून आंघोळ करा. याशिवाय जिथे खाज असेल तिथे कापसाच्या मदतीने हा रस शरीरावर लावा.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Pregnant woman