जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! 2, 3, 4 नव्हे तर तब्बल 13; एकाच वेळी इतक्या बाळांना जन्म देणार ही महिला

OMG! 2, 3, 4 नव्हे तर तब्बल 13; एकाच वेळी इतक्या बाळांना जन्म देणार ही महिला

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

महिलेने याआधी जुळ्या आणि तिळ्या मुलांना जन्म दिला आहे. आता तिच्या पोटात 13 मुलं असल्याचा दावा केला जातो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेक्सिको सिटी, 21 जून : एखादी महिला फार फार तर एकाच वेळी किती मुलांना जन्म देईल. 2, 3, 4. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एक महिला एकाच वेळी तब्बल 13 मुलांना जन्म देणार आहे. या महिलेच्या पोटात 13 बाळ असल्याचा दावा केला जातो आहे. मेक्सिकोतील या महिलेच्या प्रेग्नन्सीची चर्चा सर्वत्र होते आहे. तिच्या प्रेग्नन्सीमुळे प्रशासनही चिंतेत आलं आहे (Woman pregnant with 13 babies). मेक्सिकोच्या  इक्सटापलुकात राहणारी मारित्जा हर्नांडेज मेंडेज, जी आधीच सहा मुलांची आई आहे.  2017 साली तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2020 साली तिला जुळी झाली आणि 2021 साली तिळ्यांना जन्म दिला आहे. आता लवकरच ती एकाच वेळी 13 मुलांना जन्म देणार आहे. हे वाचा -  OMG! एका महिलेने तब्बल 69 मुलांना दिला जन्म; VIRAL PHOTO मागील नेमकं सत्य काय? तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी इतक्या मुलांचा जन्म होणं हे दुर्मिळ आहे. तसंच एकाच वेळी इतक्या मुलांची डिलीव्हरी हे धोकादायक आहे. पण ही तेराही मुलं ठिक आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याचं स्थानिक काऊन्सलर गेरार्डाे ग्युरेरो  यांनी सांगितलं.  मिरर यूके च्या रिपोर्टनुसार, ग्युरेरो यांनी नागरिकांना या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, मारित्जाचा नवरा अँटोनिया 14 वर्षांपासून अग्निशमन जवान म्हणून काम करत आहे. त्यांना जितका पगार मिळतो. त्यात ते 19 मुलांचं पालनपोषण करू शकत नाही. अशी बरीच कामं आहेत, ज्यात इतक्या मुलांना सांभाळता येईल इतका पगार मिळत नाही.  लोकांनी अँटोनिया यांची ओळख करून घ्यावी आणि एकत्र मिळून त्यांना मदत करावी, असं मी आवाहन करतो. जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचा खर्च पेलू शकतील. हे वाचा -  Shocking! जन्मानंतर 2 वर्षांतच चिमुकला ‘तरुण’ झाला; प्रायव्हेट पार्टमधील बदल पाहून डॉक्टरही शॉक गेरार्डो यांनी महापौर फेलिप अरविजू यांना या प्रकरणात लक्ष द्यायला सांगितलं आहे. या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना पडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी त्यांना केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात