मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Shocking! जन्मानंतर 2 वर्षांतच चिमुकला 'तरुण' झाला; प्रायव्हेट पार्टमधील बदल पाहून डॉक्टरही शॉक

Shocking! जन्मानंतर 2 वर्षांतच चिमुकला 'तरुण' झाला; प्रायव्हेट पार्टमधील बदल पाहून डॉक्टरही शॉक

2 वर्षांच्या चिमुकल्यामध्ये तारुण्याची लक्षणं, वैद्यकीय चाचणीतून झाला धक्कादायक खुलासा.

2 वर्षांच्या चिमुकल्यामध्ये तारुण्याची लक्षणं, वैद्यकीय चाचणीतून झाला धक्कादायक खुलासा.

2 वर्षांच्या चिमुकल्यामध्ये तारुण्याची लक्षणं, वैद्यकीय चाचणीतून झाला धक्कादायक खुलासा.

    लंडन, 20 जून : मुलं जसजशी मोठी होतात तसतसे त्यांच्या शरीरात बदल होतात. किशोरवयात येताच मुलांमध्ये हार्मोन्स चेंजेस होतात आणि त्याची लक्षणं शरीरावर दिसू लागतात. पण लहान मुलाच्या शरीरातील बदलाचं एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे पाहून डॉक्टरही शॉक झाले आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये असा बदल झाला जो तरुणांमध्ये होते. अवघ्या दोन वर्षांतच हा चिमुकला तरुण बनला (Puberty signs in 2 year old boy). सामान्यपणे मुली-मुलांमध्ये वयात आल्याची लक्षणं 12 ते 16 वर्षांपासून दिसू लागतात. किशोरवयात त्यांच्या शरीर आणि गुप्तांगामध्ये झालेले बदल दिसू लागतात. पण दोन वर्षांचा मुलगा ज्याचा शारीरिक आणि मानसिक विकासही अद्याप पूर्ण झालेला नाही, अशा मुलामध्ये तारुण्याची लक्षणं दिसू लागली. डॉक्टरांनी याला दुर्मिळ प्रकरण म्हटलं आहे (Testosterone level high in 2 year old boy). 16 वर्षांच्या मुलामध्ये दिसावीत अशी लक्षणं या दोन वर्षांच्या मुलामध्ये दिसली. या मुलाचं वजन 12 किलो आहे. पण त्याचं हे वजन फॅट नाही तर मांसपेशी आहेत. हे वाचा - Yoga Boosts Fertility: योगामुळे पुरुष-स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारते; हे प्रकार नियमित करून बघा परिणाम डेली मेलच्या रिपोर्टनुसार मुलाच्या आईने सांगितलं की, त्याची ब्लड टेस्ट झाली. त्यात त्याच्या सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असल्याचं निदान झालं. हे हार्मोन पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात तयार होतात. पण एका लहान मुलामध्ये इतक्या प्रमाणात हार्मोन्स दिलल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. डॉक्टरांच्या मते, हा मुलगा आर्टिफिशिअल टेस्टोस्टोरॉनच्या संपर्कात आल्याने असं झालं असावा. कारण मुलाच्या वडिलांना टेस्टिससंबंधी गंभीर आजार आहे. त्यासाठी कित्येक वर्षे ते दररोज त्वचेवर टेस्टोस्टेरॉन जेल लावतात. या जेलचा वापर खांदा, हात आणि पोटांवर केलं जातं. त्वचा हे जेल शोषून घेते. हे वाचा - Parenting Tips : तुमच्या वयात येणाऱ्या मुलांशी अशी करा मैत्री, मार्गदर्शन करणे होईल सोपे डॉक्टरांच्या मते, मुलाच्या वडिलांनी हे जेल लावल्यानंतर मुलगा त्यांच्या संपर्कात आला असावा त्यामुळे जेलचा परिणाम मुलावरही झाला असेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Parents and child, Serious diseases

    पुढील बातम्या