मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीचं प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले

10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीचं प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

ब्रिटन, 14 सप्टेंबर : एकाच वेळी एक किंवा दोन म्हणजे जुळ्या बाळांचा जन्म होतो. तीन किंवा चार बाळांचाही जन्म झाल्याची प्रकरणं आपण पाहिली आहेत. पण प्रेग्नन्सीचं (Pregnancy) एक असं प्रकरण सध्या चर्चेत आहे, ज्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. पण ही मुलं एकाच वेळी जन्माला आलेली नाहीत तर ही महिला 10 महिन्यांत चक्क दोनदा प्रेग्नंट झाली (Woman pregnant twice in 10 months).

यूकेत राहणारी 23 वर्षांची शॅरना स्मिथ (Sharna Smith) 6 जानेवारी 2020 रोजी तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा प्रेग्नंट झाली आणि 30 ऑक्टोबर, 2020 ला तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.

द सनच्या रिपोर्टनुसार शॅरनाने सांगितलं की, तिचा मुलगा तीन महिन्यांचा होता तेव्हा तिला समजलं की ती पुन्हा प्रेग्नंट आहे. त्यावेळी तिला धक्काच बसला. रुग्णालयात ती तपासणीसाठी गेली तेव्हा ती जुळ्या मुलांची आई होणार आहे, हे समजलं. हे विचित्र प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले.

हे वाचा - Shocking! ना प्रेग्नन्सीचं लक्षण, ना बेबी बम्प; तिने 2 महिन्यात दिला बाळाला जन्म

शॅरनाची तिन्ही मुलं आता एक वर्षांची झाली आहेत. तिचा जोडीदारासोबत तिचं नातं तुटलं आहे. पण ती आपल्या तिन्ही मुलांसोबत आनंदाने राहत आहे.

याआधीसुद्धा अमेरिकेत प्रेग्नन्सीचं असंच एक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांतच महिलेची दुसरी डिलिव्हरी झाली. त्यावेळी तिला जुळी मुलं झाली. न्यूयॉर्कमधील  33 वर्षांची कायली डेशनच्या पहिल्या बाळाचा जन्म 28 डिसेंबर 2019  ला झाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाचा जन्म 2 जानेवारी, 2020 रोजी झाला.  कायलीने सर्वात कमी अंतराने दुसरी प्रसूती होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

हे वाचा - पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म

डेली मेलच्या रिपोर्टनुसार कायलीला प्रेग्नन्सीच्या 22 व्या आठवड्यात प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. हे बाळ खूपच लहान होतं. त्याचं वजन फक्त 454 ग्रॅम होतं.  कायलीच्या गर्भात आणखी दोन बाळं होती. त्यांच्या जन्मासाठी ती हॉस्पिटलमध्ये थांबली. तिने डॉक्टरांना याबाबतही विचारलंही. पण या बाळांच्या जन्मासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असं डॉक्टारांनी तिला सांगितलं. यानंतर पाच दिवसांतच कायलीला पुन्हा प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने जुळ्यांना जन्म दिला.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman