मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; महिलेने 2 महिन्यांत दिला बाळाला जन्म

कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; महिलेने 2 महिन्यांत दिला बाळाला जन्म

2 महिन्यांत बाळ होताच महिला आणि तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला,

2 महिन्यांत बाळ होताच महिला आणि तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला,

2 महिन्यांत बाळ होताच महिला आणि तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला,

  • Published by:  Priya Lad

ब्रिटन, 13 सप्टेंबर : मासिक पाळी थांबणं, उलटी होणं किंवा मळमळणं, चक्कर येणं ही काही प्रेग्नन्सीची (Pregnancy) मुख्य लक्षणं (Pregnancy symptoms) आहेत. शिवाय प्रेग्नन्सीचा कालावधी (Pregnancy period) हा 9 महिन्यांचा असतो.  या कालावधीत पोट वाढतं म्हणजे बेबी बम्प (Baby bump) दिसू लागलं. पण एका महिलेला मात्र प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं न दिसता फक्त 2 महिन्यांतच तिने बाळाला जन्म दिला आहे (Woman Gives birth in 2 months Pregnancy).

तसं प्रेग्नन्सीचा कालावधी 9 महिन्यांचा असला तरी काही मुलांचा जन्म त्याआधीसुद्धा होतो. ज्यांना प्रिमॅच्युअर बेबी (Premature Pregnancy) म्हटलं जातं. पण शक्यतो असे बाळ सातव्या महिन्यांत किंवा त्यानंतर जन्माला येतात. पण कधी दोन महिन्यांतच बाळ जन्मल्याचं ऐकलं आहे का?

इंग्लंडच्या (England) नॉरफोकमधील (Norflok) 20 वर्षांची एरिन हॉगने  (Erin Hogg) 2 महिन्यांतच बाळाला जन्म दिला आहे. यामुळे तिच्यासह तिच्या नवऱ्यालाही धक्का बसला आहे.

हे वाचा - पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म

10 ऑगस्टला एरिनच्या पोटात दुखू लागलं. ती क्वीन एलिजाबेथ रुग्णालयात गेली. तिथं तिला ती प्रेग्नंट असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या प्रेग्नन्सीला  6 ते 8 आठवडे पूर्णझ झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. रुग्णालयातून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा तीव्र वेदना होऊ लागल्या. तिने रुग्णालयात फोन केला. तिच्यासाठी अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली, डॉक्टरही तिच्या घरी आले. पण तीच्या वेदना इतक्या वाढत गेल्या की घरीच तिची डिलीव्हरी करावी लागली.

सहा ते आठ आठवड्यांतच बाळाचा जन्म झाल्याने एरिन आणि तिचा नवरा शॉक झाले. तिला मुलगी झाली होती, जी एकदम निरोगी होती. डिलीव्हरीनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. प्रसूतीवेळी तिचा रक्तस्राव खूप झाला त्यामुळे तिला रक्त चढवण्यात आलं.

हे वाचा - अवघ्या 1 सेकंदात रडणाऱ्या बाळाला करा शांत; ही ट्रिक कधीच होत नाही फेल

15 महिन्यापूर्वी महिलेने याच रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर ती स्कॉटलँडमध्ये आपल्या कुटुंबाला भेयटाला गेली होती. आपण प्रेग्नंट आहोत याची काहीच कल्पना तिला नव्हती. तशी प्रेग्नन्सीची लक्षणंही तिच्यात नव्हती. एरिनने सांगितलं, तिची मासिक पाळी नियमित होती. तिच्यामध्ये प्रेग्नन्सीची लक्षणंही नव्हती. प्रेग्नंट महिलांप्रमाणे तिचं पोटही बाहेर आलं नव्हतं. तिला कोरोना झाला होता, त्यानंतर तिने कोरोना लशीचा पहिला डोसही घेतला होता.

पोटात तीव्र वेदना असल्याने ती डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांना तिने टेस्ट करायला सांगितली. पण डॉक्टरांनी गरज नसल्याचं सांगत टेस्ट करण्यास टाळाटाळ केली. रुग्णालयाने दोन महिन्यांची प्रेग्नंट असल्याची चुकीची माहिती दिली, याबाबत रुग्णालयावर केस करणार असल्याचं तिने सांगितलं.

First published:

Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman