• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म

पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म

आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते याचा आपण विचारही करू शकत नाही.

 • Share this:
  ब्रिटन, 13 सप्टेंबर : आई (Mother) आपल्या मुलांसाठी (Child) काहीही करू शकते, हे आपल्याला माहितीच आहेच. आपल्या मुलांवर संकट येताच ती ढाल बनून त्यांच्यासमोर उभी राहते. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलांच्या जीवासाठी धडपडत असते. आई आपल्या मुलांसाठी कधी काय करेल याचा आपण विचारही करू शकत नाही. यूकेमधील अशाच एका आईने आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी जे केलं ते वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या आईने आपल्या बाळासाठी चक्क आपला पाय कापून घेतला आहे (Mother amputate leg for unborn baby). विस्बेकमध्ये राहणारी 28 वर्षांची कॅथलीन ओसबोर्न प्रेग्नंट होती. त्याचवेळी तिला कॅन्सर असल्याचं निदान झालं. तिच्या पायात ट्युमर होता. आता कॅन्सर म्हटलं की किमोथेरेपी आलीच. पण पोटात बाळ असल्याने तिला कॅथलीनला किमोथेरेपी घेणं शक्य नव्हतं. हे वाचा - अवघ्या 1 सेकंदात रडणाऱ्या बाळाला करा शांत; ही ट्रिक कधीच होत नाही फेल तिच्याकडे दोन मार्ग होते एक तर ट्युमरपासून आपला जीव वाचवण्यासाठी तिला गर्भपात करावा लागणार होता, जेणेकरून ती किमोथेरेपी घेऊ शकेल. नाहीतर दुसरा मार्ग म्हणजे तिला तिचा पायच कापून टाकावा लागणार होता. कॅथलीनने दुसरा मार्ग निवडला. तिने आपल्या न जन्मलेल्या बाळाला गमावण्यापेक्षा आपला पाय गमावणं स्वीकार केलं. प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यात तिचा पाय कापण्यात आला. मार्चमध्ये तिने बाळाला जन्म दिला. तिचं बाळ प्रसूतीच्या वेळेआधीच जन्माला आलं होतं. हे वाचा - Shocking! छातीचा झाला दगड, फुगू लागले ब्रेस्ट; सर्जरीनंतर महिलेची भयंकर अवस्था कॅथलीनला आधीसुद्धा दोन वेळा कॅन्सर झाला होता. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार कॅथलीन सांगते, "मी माझ्या निर्णयाने आनंदी आहे. कारण माझ्या दोन मुलांना एक बहीण हवी होती. माझ्याकडे आता काही महिने किंवा काही वर्ष शिल्लक आहेत. माझ्या मुलांसोबत वेळ घालवून मला काही आठवणी जमवायच्या आहेत. आता माझी मुलंच माझं आयुष्य आहे, मला माझी काहीच चिंता वाटत नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या मुलांसोबत आनंदाने जगायचं आहे"
  Published by:Priya Lad
  First published: