Home /News /lifestyle /

मासिक पाळीत पाणी न प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम?

मासिक पाळीत पाणी न प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम?

थकव्यामुळे जांभई येते. त्यामुळे पाणी पिण्याने देखील फायदा होतो. पाण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट होईल आणि ताजंतवानं वाटायला लागेल.

थकव्यामुळे जांभई येते. त्यामुळे पाणी पिण्याने देखील फायदा होतो. पाण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट होईल आणि ताजंतवानं वाटायला लागेल.

महिलांनी आपलं आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्त्वाचं आहे.

मुंबई, 22 जून : आपल्या शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिणं (Drinking Water) हे आरोग्याच्या (Health) दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. शरीराचं तापमान योग्य ठेवणं,शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकणं यासाठी पाणी गरजेचं असतं. काही लोकांना पाणी कमी पिण्याची सवय असते, त्यामुळं अनेक त्रास होऊ शकतात. महिलांनी आपलं आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं पाणी योग्य प्रमाणात पिणं महत्त्वाचं आहे. अनेकदा स्त्रिया मासिक पाळीच्या काळात खूप थकल्यासारखं वाटणं, पाठ, कंबरदुखी, लघवीला कमी होणं, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी करतात. असे त्रास होण्यामागं एक प्रमुख कारण आहे पाण्याची कमतरता. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होतं ज्याला डिहायड्रेशन म्हणतात. त्याचे अनेक दुष्परिणाम आरोग्यावर होतात. हे परिणाम टाळायचे असतील तर महिलांनी मासिकपाळीच्या काळात आपण पुरेसे पाणी पितोय नां याकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हे वाचा - कानातल्या मळाला त्रासलात?; मायक्रोसक्शन पद्धत माहिती आहे का? अन्यथा खालील त्रासांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. हेल्थशॉटसनं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सूज आणि पेटके मासिकपाळीच्या काळात स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची पातळी कमी होते त्यामुळं शरीरात पाणीही कमी होते. आणि शरीरावर सूज (Swelling) जाणवते. कधीकधी पेटके (Cramps) येतात. त्यामुळं या काळात दिवसातून कमीतकमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळं सूज आणि पेटके येणे कमी होते. मायग्रेन आणि डोकेदुखी शरीरातील पाणी कमी झाल्यानं (Dehydration) डोकेदुखी (Headache) आणि मायग्रेनसारखे (Migraine) आजारही होतात. पाणी कमी झाल्यानं आपल्या मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. पुरेसे पाणी नसल्यामुळे मेंदू कवटीपासून दूर होतो, यामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. पुरेसे पाणी पिण्यामुळे मेंदू पूर्व स्थितीत येतो आणि डोकेदुखी, मायग्रेनमधून सुटका होते. लघवी कमी होणे शरीरातील पाणी कमी झाले की मूत्रपिंडाच्या कामावरही परिणाम होतो. तिथंही पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानं मूत्रनिर्मिती कमी होते. तसंच मूत्राचा रंगही बदलतो. मूत्राचा रंग लालसर होतो. लघवीचे प्रमाण कमी झालं तर ओटीपोटात वेदना (Pains) होऊ शकतात. ज्यामुळे अस्वस्थता येते. पाणी पिण्यामुळे या वेदना कमी होतात आणि लघवीचे प्रमाणही सुधारेल. थकवा जाणवणे मासिक पाळीच्या काळात थकवा (Tiredness) जाणवत असल्यास आपण पाणी कमी पीत आहोत, हे लक्षात घ्यावं. शरीरातील पाणी कमी झाल्यानं रक्तदाब कमी होतो, त्यामुळं शरीरातील ऊर्जा कमी होते. पुरेसे पाणी घेत नाही तर शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते, त्यामुळं त्वचेला, स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक प्रमाणात पंप करावे लागते. परिणामी थकवा जाणवतो. हे वाचा - फक्त गोवा, शिमला नाही; तर Honeymoon साठी उत्तम आहेत भारतातील ही 10 स्थळं हे सगळे दुष्परिणाम टाळायचे असतील तर महिलांनी मासिक पाळीच्या काळात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. तर असे कोणतेही त्रास या काळात होणार नाहीत आणि हा त्रासदायक कालावधीही तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Lifestyle, Periods, Water, Woman

पुढील बातम्या