Teddy Day 2021: वाचा पहिल्या टेडी बिअरच्या जन्माची कथा

व्हॅलेंटाइन्स डेचा खुमार सगळीकडे पसरतोय. आपल्या जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करायला टेडी डे हा सर्वोत्तम दिवस आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट देऊ शकता.

Teddy Day 2021: प्रेमाचं प्रतीक मानलं जाणारा टेडी नेमका कधी व कुठून आला ह्याचा विचार कधी तुम्ही केलाय का?

  • Share this:

    वॉशिंग्टन, 10 फेब्रुवारी : टेडी (teddy) म्हटला की फक्त लहान मुलंच नाही तर अगदी मोठी माणसंही वेडी होतात. शांत, हसरा आणि लुसलुशीत असा हा टेडी बिअर (teddy bear) प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. वॅलेंटाइन वीकमधील (valentine week) आजचा दिवस आहे तो टेडी डे (teddy day). आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाचं प्रतीक म्हणून टेडी बिअर (teddy bear) दिला जातो आहे. मात्र हा टेडी बिअर नेमका आला कुठून याचा विचार तुम्ही कधी केला का?

    टेडी बिअरची कल्पना आली कुठून? अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष थेडॉर रुजवेल्ट मिसीसिपीच्या जंगलात गेले होते. तिथं त्यांना एका झाडाला अस्वलाला बांधून ठेवल्याचं दिसलं. अस्वल जखमी झालं होतं. रुजवेल्ट यांनी या अस्वलाला मुक्त केलं. त्यानंतर या घटनेची चर्चा संपूर्ण अमेरिकेत झाली. अमेरिकेतील त्यावेळच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रात कार्टुनिस्ट बेरीमेन यांनी ही घटना रेखाटणारं कार्टुन काढलं होतं, त्यातील कार्टुन अस्वल लोकांना खूपच आवडलं. हेदेखील वाचा   Valentine Day 2021: कोरोना काळात असा साजरा करा व्हॅलेंटाईन डे; काय गिफ्ट्स द्याल जगातील पहिला टेडी या अस्वलाच्या कार्टुनने प्रभावित होऊन अमेरिकेतील टॉयमेकर मॉरिस मिचटॉम यांनी खेळणं म्हणून कापडी अस्वल तयार केलं आणि त्याला टेडी बिअर असं नाव दिलं. टेडी हे रूजवेल्ट यांचं टोपणनाव होतं, त्यामुळे खेळण्यातील या अस्वलाला टेडी बिअर असं नाव देण्यात आलं. रूजवेल्ट यांनी अधिकृतरित्या या खेळण्याला टेडी बिअर असं नाव देण्यास मंजुरी दिल्यानंतर हे खेळणं बाजारात आलं. 1903 साली पहिला टेडी बिअर विक्रीसाठी ठेवण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या टेडी बिअरची क्रेझ अजूनही आहे.
    Published by:Aditya Thube
    First published: