Home /News /lifestyle /

इतकं सुंदर दिसणं कसं शक्य आहे? महिलेचा Before-After look पाहून व्हाल शॉक

इतकं सुंदर दिसणं कसं शक्य आहे? महिलेचा Before-After look पाहून व्हाल शॉक

या महिलेच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

    मॉस्को, 28 जुलै : हल्ली तरुणींचं वय पटकन लक्षात येत नाही. काही जणांना वाढत्या वयातही तसं नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं असतं आणि नसलं तरी ते मेकअपने शक्य होतं. मग एखाद्या आजीलासुद्धा तरुण दिसायचं असेल तर ते शक्य होतं. मेकअपचा (Makeup) बिफोर आणि आफ्टर लूक पाहून तर अनेकदा विश्वासही बसत नाही. अशाच एका महिलेचा बिफोर आणि आफ्टर लूक (Woman before after look) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा लूक पाहून सर्वांना शॉक बसला आहे (Shocking look transformation). सुंदर दिसण्यासाठी या महिलेने मेकअप केला. पण तिचा चेहरा इतका बदलला आहे की ही तिच महिला आहे, यावर विश्वासच बसणार नाही. ही तीच महिला आहे की दुसरी कुणी यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. वेलेरिया वोरोनिनाने या टिकटॉक युझरने आपल्या टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं आपला बिफोर आणि आफ्टर असा व्हिडीओ शेअर केला आहे. वेलेरियाचा लूक पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. इतकं कुणी काय कसं वेगळं दिसू शकतं किंवा बदलू शकतं, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. हे वाचा - Shocking! गुदद्वारातून त्याने शरीरात सोडला मासा; पोटात जाताच झाली भयंकर अवस्था व्हिडीओत सुरुवातीला पाहू शकता, वेलेरिया सुरुवातीला कशी दिसते. मोठं नाक, पिवळे दात, पांढरे केस, चेहऱ्यावर डाग असलेली त्वचा आणि डोळ्यावर मोठा चष्मा. दुसऱ्या क्षणी वेलेरियाच्या जागी दिसते ती कुरळे केस, टोकदार नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आणि  ग्लिटरी आय मेकअप केलेली तुळतुळीत चेहरा असलेली सुंदर तरुणी. खरंच ही वेलेरिया आहे का? मेकअप कमाल करतं, आपलं खरं वयही त्यामुळे झाकता येतं. पण इतकं? हे कसं काय शक्य आहे? शक्यच नाही. अशीच प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.  मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार दुसऱ्यांदा दिसलेली महिला ही वेलेरिया नाहीच असंच अनेकांनी म्हटलं आहे. ती वेलेरिया असल्याचं थेट नाकारला आहे. हे वाचा - दिवसभरात बदलावे लागतात 100 डायपर्स, 9 बाळांच्या आईचा संघर्ष तुम्हाला काय वाटतं मेकअप इतकी कमाल करू शकतं? दुसरी तरुणीसुद्धा वेलेरियाच आहे की दुसरी कोणती तरुणी आहे? तुमची प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियावरील कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, New look, Tiktok viral video, Viral, Woman

    पुढील बातम्या