मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Shocking! गुदद्वारातून त्याने शरीरात सोडला Eel fish; पोटात जाताच झाली भयंकर अवस्था

Shocking! गुदद्वारातून त्याने शरीरात सोडला Eel fish; पोटात जाताच झाली भयंकर अवस्था

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार टॉयलेट पेपरच्या वापराने योग्य पद्धतीने स्वच्छता होत नाही तर काही डॉक्टरांच्या मते यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्त भीती असते. यामुळे युरिन ट्रॅक इन्फेक्शन,फिशर सारखे त्रास होतात. तर, जास्त पावराने ती जागा फाटू शकते.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार टॉयलेट पेपरच्या वापराने योग्य पद्धतीने स्वच्छता होत नाही तर काही डॉक्टरांच्या मते यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्त भीती असते. यामुळे युरिन ट्रॅक इन्फेक्शन,फिशर सारखे त्रास होतात. तर, जास्त पावराने ती जागा फाटू शकते.

एका समस्येतून सुटण्यासाठी त्याने ईल मासा आपल्या गुदद्वारातून (Man insert fish from rectum) आत टाकला. पण त्याचा भलताच परिणाम झाला.

बीजिंग, 28 जुलै : माशाचं (Fish) कालवण किंवा फ्राय केलेल्या माशांवर तुम्ही ताव मारत असाल. पण कधी जिवंत मासा तोंडातून घेण्याचा प्रयत्न केला आहे? साहजिकच असा प्रयत्न कुणीच करणार नाही. पण एका व्यक्तीने तर हद्दच केली. जिवंत मासा तोंडातून सोडा त्याने चक्क आपल्या गुदद्वारातून (Man insert fish from rectum) आत टाकला. त्याच्या या विचित्र प्रयोगाचा त्याच्यावर भयंकर परिणाम झाला.

ही धक्कादायक घटना घडली आहे चीनमध्ये (China). जिआंगसू प्रांतातील (Jiangsu Province) एका व्यक्तीने 20 जुलैला आपल्या गुदद्वारातून (Rectum) ईल (Eel) त्याने मासा (Eel fish) शरीराच्या आत टाकला (Man insert Eel fish from rectum). जवळपास 20 सेंटीमीटर लांबीचा हा मासा. मासा गुदद्वारामार्गे व्यक्तीच्या पोटापर्यंत पोहोचला. त्यानंतर मात्र त्याची भयंकर अवस्था झाली.

त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला त्याने वेदना सहन केल्या पण अखेर वेदना तीव्र झाल्या, त्या असह्य होताच तो रुग्णालयात गेला. अखेर त्याचं ऑपरेशन करावं लागलं.

हे वाचा - फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार चीनच्या  या व्यक्तीचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की माशामुळे त्याच्या मोठ्या आतड्यांमध्ये हेमोलिसिसला कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया पोहोचले होते. ऑपरेशननंतर जेव्हा त्याच्या पोटातून ईल बाहेर काढली तेव्हा ती जिवंत होती.

आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल तो म्हणजे या व्यक्तीने असा विचित्र प्रयोग केला तरी का? तर हा त्याच्या विचित्र प्रयोग म्हणजे चीनमध्ये केला जाणारा विचित्र देशी उपचार आहे. ईल मासा शौचाची समस्या दूर कऱण्यास मदत करतो, असं इथं मानलं जातं. या व्यक्तीलाही बद्धकोष्ठतेची समस्या होती. त्यामुळे त्याने हा देशी उपचार आजमवण्याचा ठरवलं. त्याने तसं केलं की पण या व्यक्तीच्या बाबतीत उलटच घडलं. हा उपचार त्याला चांगलाच महागात पडला. माशाने त्याची शौचाच्या समस्या तर दूर केली नाहीच उलट त्याची समस्या वाढवली.

हे वाचा - OMG! शरीरावर अशी एकही जागा नाही जिथं गाठ नाही; या महिलेला नेमकं झालंय तरी काय?

दरम्यान ही अशी पहिलीच घटना नाही, याआधीसुद्धा चीनमध्ये अशाच घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.

First published:

Tags: China, Fish, Lifestyle, Shocking, Shocking news