Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे? बाळ जन्माला येईपर्यंत तिला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नंट होती

कसं शक्य आहे? बाळ जन्माला येईपर्यंत तिला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नंट होती

ती गर्भनिरोधक गोळ्या घेत होती, तिला पीरियड्सही येत होते आणि पोटही सपाट होतं. प्रेग्नन्सीची (Pregnancy) कोणतीच लक्षणं तिच्यात दिसत नव्हती.

    ब्रिटन, 25 मार्च : मळमळ, उलटी, शरीर जड झाल्यासारखं वाटणं, मासिक पाळी चुकणं ही प्रेगन्सीची लक्षणं (Pregnancy symptoms). प्रेग्नंट झाल्यानंतर महिलेचं पोट वाढू लागतं. पण अशी कोणतीच लक्षणं नसतानाही एका महिलेनं बाळाला जन्म दिला. आश्चर्य  म्हणजे बाळाचा जन्म होईपर्यंत त्या महिलेसुद्धा ती प्रेग्नंट आहे हे माहितीच नव्हतं. प्रेग्नन्सीची ही विचित्र घटना आहे यूकेतील.  27 वर्षांची क्लेरे व्हाइझमॅन तिला मूल होईपर्यंत ती प्रेग्नंट आहे हे माहितीच नव्हतं. एप्रिल 2018 मध्ये तिने अशा विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव घेतला. आज तिचं मूल दोन वर्षांचं आहे. क्लेरी आणि तिचा बॉयफ्रेंड बेन 2016 साली एका पबमध्ये भेटले होते,  तेव्हापासून ते कपल होते. ते दोघंही आपल्या पालकांसोबत राहत होते पण एकमेकांना भेटत होते. दर आठवड्याला मित्रांसोबत नाइट आऊट करत होते. एप्रिल 2018 मध्ये क्लेरेने आपल्या 25 व्या वाढदिवसाची पार्टी केली होती. क्लेरे म्हणाली, तेव्हा मी घट्ट टॉप, जिन्स आणि हिल्स घातली होती. मला माझे कपडे नीट होत होते. मी खूप ड्रिंकसुद्धा केलं. पण त्याच्या चार दिवसांनंतर तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. क्लेरीने सांगितलं,  त्या दिवशी मला माझी मुलगी मिलीला तिच्या वडिलांकडून आणायचं होतं त्यामुळे मी पॅरासिटामोल घेतली आणि तिला आणायला गेले. घरी परतल्यानंतर माझ्या पोटातील वेदना तीव्र झाल्या. मला वाटलं पीरिअड पेन असावं म्हणून मी थोडा आराम ेला. पण 20  मिनिटांनी वेदना अधिक तीव्र झाल्या आणि मी उठले. आईला फोन केला आणि तिला बोलावलं. हे वाचा - अरे बापरे! व्यक्तीच्या पोटातून बाहेर आला अजगरापेक्षाही लांब जंत; डॉक्टरही शॉक क्लेरीच्या पोटातील वेदना अधिकच तीव्र होत होत्या. तिला जोर द्यावासा वाटत होता. आईच्या मदतीने ती किचनमध्येच उशी घेऊन जमिनीवर झोपली. त्यावेळी तिच्या दोन पायांच्या मधून डोकं दिसत होतं. तिच्या आईने तिला पुश करायला सांगितलं आणि काही क्षणातच एका बाळाचा जन्म झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. क्लेरी म्हणाली, मला धक्काच बसला होता.  मी गर्भनिरोधक गोळ्या घेत होते, मला पीरियड्स येत होते आणि माझं पोटही सपाट होतं, मला सर्व कपडे नीट होत होते. प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. नऊ महिने माझ्या पोटात बाळ होतं हे मला माहितीच नव्हतं.  डॉक्टर मला बाळाला ब्रेस्टफिडिंग करण्यास सांगत होते पण मी नकार दिला. ते माझं बाळ आहे, हे मी स्वीकारायलाच तयार नव्हते. हे वाचा - Shocking video : 12 व्या मजल्यावरून कोसळला, स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा डेली मेलच्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी cryptic pregnancy किंवा प्रेग्नन्सी डिनाइल pregnancy denial'  म्हणतात. तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंव अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापर नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते. काही महिलांना प्रेग्नन्सीतही रक्तस्राव होतो. गर्भनिरोधक गोळ्या महिला तर आपण प्रेग्नंट आहोत हे स्वीकारण्यास तयार नसतात पण सातत्याने अशा गोळ्या घेतल्यासही त्या प्रेग्नंट राहू शकतात. गोळ्यांमध्ये समस्या आहे म्हणून नाही तर एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant, Woman

    पुढील बातम्या