मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

12 व्या मजल्यावरून कोसळला आणि स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा...; Shocking video viral

12 व्या मजल्यावरून कोसळला आणि स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा...; Shocking video viral

व्हिडीओ पाहताच काळजात सुरुवातीला धस्सं होतंच.

व्हिडीओ पाहताच काळजात सुरुवातीला धस्सं होतंच.

व्हिडीओ पाहताच काळजात सुरुवातीला धस्सं होतंच.

  • Published by:  Priya Lad
मॉस्को, 25 मार्च : देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्यय हा व्हिडीओ (Accident video) पाहून येईल. ज्यामध्ये अवघ्या पाच वर्षांचा चिमुरडा बाराव्या मजल्यावरून कोसळला (Boy fall from building) पण त्याला साधं खरचटलंही नाही. ही दुर्घटना सीसीटीव्ही (CCTV video) कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मीडियावर दुर्घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे. ही घटना आहे रशियातील (Russia). सोमवारी पाच वर्षांचा मुलगा बाराव्या मजल्यावरून खिडकीतून पडला तो थेट जमिनीवर कोसळला. जमिनीवर तो तोंडावरच आपटला. इतक्या उंचावरून खाली पडूनही मुलाला काहीच झालं आहे. याचं कारण म्हणजे जमिनीवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली होती. उंचावरून येत मुलगा थेट बर्फावर आदळला. त्याला खरचटलं नाही पण त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आला. त्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. हे वाचा - बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा मुलगा जेव्हा बाराव्या मजल्याच्या खिडकीतून खाली कोसळला तेव्हा तो घरात एकटाच होता, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्या मुलाच्या मदतीसाठी आले आणि त्यांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान मुलाचे आईवडील यावेळी कुठे गेले होते याची माहिती नाही. याबाबत अद्याप अधिक तपास सुरू आहे.
First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

पुढील बातम्या