मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अरे बापरे! हे काय? व्यक्तीच्या पोटातून बाहेर आला अजगरापेक्षाही लांब जंत; डॉक्टरही शॉक

अरे बापरे! हे काय? व्यक्तीच्या पोटातून बाहेर आला अजगरापेक्षाही लांब जंत; डॉक्टरही शॉक

तब्बल 59 फूट (59 feet tapeworm) लांबीचा हा जंत आहे. जो पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

तब्बल 59 फूट (59 feet tapeworm) लांबीचा हा जंत आहे. जो पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

तब्बल 59 फूट (59 feet tapeworm) लांबीचा हा जंत आहे. जो पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

  • Published by:  Priya Lad

बँकॉक, 25 मार्च :  पोटात जंत होणं तसं आपल्यासाठी काही नवं नाही. लहान मुलांना तर सामान्यपणे ही समस्या असतेच. त्यांच्या पोटात छोटे छोटे जंत असतात. पण कधी अजगरापेक्षाही लांब जंत तुम्ही पाहिला आहे का? थायलंडमधील 67 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून इतक्या लांब आकाराचा जंत बाहेर पडला आहे. तब्बल 59 फूट लांबीचा हा जंत आहे. जो पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

थायलँडमधील 67 वर्षांची व्यक्तीला पोटात तीव्र वेदना होत होत्या. पोटातील गॅसमुळेसुद्धा ही व्यक्ती वैतागली होती.  या तक्रारीसह ही व्यक्ती रुग्णालयात गेली. या व्यक्तीच्या मलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये जंताची तब्बल 28 अंडी सापडल्याचं आढळलं. त्यामुळे या व्यक्तीला जंताचं औषध देण्यात आलं.

19 मार्चला रुग्णाने जंताचं औषध घेतलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 मार्चला त्याच्या गुदद्वारातून भलामोठा जंत बाहेर आला. तब्बल 59 फूट म्हणजे 18मीटर लांबीचा हा जंत. म्हणजे एका अजगरापेक्षाही जास्त लांबीचा हा जंत होता.

हे वाचा - Shocking video : 12 व्या मजल्यावरून कोसळला, स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा

पॅरासाईट डिसीज रिसर्च सेंटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या सेंटरमध्ये ज्या रुग्णाचे नमुने पाठवण्यात आले त्याच्या पोटातून  18 मीटरपेक्षा लांब जंत बाहेर आला आहे.  रात्री झोपण्यापूर्वी त्याला जंताचं औषध देण्यात आलं आणि सकाळीच त्याच्या गुदद्वारातून हा जंत बाहेर आला.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार गेल्या 50 वर्षांत थायलंडमध्ये सापडलेला सर्वात मोठा जंत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. असे जंत मानवी शरीरात तीसपेक्षा जास्त वर्षे राहू शकता. पण सध्या बरीच औषधं उपलब्ध असल्याने इतका काळ ते मानवी शरीरात टिकाव धरू शकत नाही.

हे वाचा - GOOD NEWS! कोरोनाची लस शोधता शोधता सापडली कॅन्सरची लस; पाहा कधी उपलब्ध होणार

कच्चा मांसाचं सेवन केल्याने या व्यक्तीला जंतसंसर्ग झाल्याचं डॉक्टकांनी सांगितलं. त्यामुळे त्याला आहार बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कच्च्या मांसाचं सेवन टाळण्यास सांगण्यात आलं आहे. शिवाय त्याच्या कुंटुंबालासुद्धा चाचणी करायला सांगितली आहे.

First published:

Tags: Health, Stomach