मेक्सिको, 08 ऑक्टोबर : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. सुरुवातीला फक्त क्रीम-पावडर, मेकअपने सौंदर्य खुलवलं जायचं. आता तर अगदी इंजेक्शन (Botox) आणि सर्जरीसुद्धा केल्या जातात. कित्येक तरुणी कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्जरी (Plastic Surgery) करून आपल्या शरीराच्या एखादा अवयव हवा तशा आकारात करून घेतात. अगदी ब्रेस्ट (Breast surgery) आणि बमचाही (Bum Transplant) आकार बदलतात. पण काही वेळा अशा सर्जरी महागात पडतात किंबहुना त्या जीवावरही बेतू शकतात. अशीच आपल्या बमची सर्जरी करणाऱ्या एका तरुणीने आपला जीव गमावला आहे (Bum lift surgery).
या सर्जरीमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागात सिलकॉन टाकून तो भाग उंच केला जातो. यासाठी खर्चही खूप येतो. पण काही लोक इतका खर्च करायलाही तयार असतात. अशात अगदी स्वस्तात ही सर्जरी करून (Cheap Plastic Surgery) मिळत असेल तर साहजिकच अशी संधी कुणीच सोडणार नाही. मेक्सिकोतील (Mexico)Elohim Integral Esthetic Services क्लिनिकमध्ये ही सर्जरी अगदी परवडणाऱ्या किमतीत करून मिळत होती. तिथं बरेच लोक जात होते. 22 वर्षांची सिंथिया लिजेथ वेगालासुद्धा (Cinthia Lizeth Vega) या क्लिनिकबाबत समजताच ती तिथं गेली.
हे वाचा - छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक
वेट्रेसची नोकरी करणाऱ्या सिंथियाला बऱ्याच दिवसापासून आपली बम अपलिफ्ट सर्जरी करायची होती. पण तिच्याकडे पैसे नव्हते. जेव्हा या क्लिनिकमध्ये फक्त 14 हजार रुपयांत ही सर्जरी केली जाते आहे, हे समजलं तेव्हा ती लगेच तिकडे गेली. पण या सर्जरीनंतर तिचा मृत्यू झाला. सिंथियाचं कुटुंबही तिला सर्जरी करू नको म्हणून सांगत होते. पण तिने कुणाचंच ऐकलं नाही. सर्जरीवेळी चुकीचं इंजेक्शन दिल्याने तिचं ब्लड प्रेशर खूप वाढलं आणि तिचा मृत्यू झाला.
सिंथियाच्या मृत्यूनंतर संबंधिक क्लिनिकची पोलखोल झाली. हे क्लिनिक अवैध होतं. म्हणजे या क्लिनिककडे त्यांच्या स्टाफरडे सर्जरीसाठी कोणताच परवाना नव्हता. कमीत कमी खर्चात सर्जरीचं आमिष दाखवून पैशांसाठी या क्लिनिकमध्ये लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. इथल्या बोगस डॉक्टरांकडून सर्जरी करून घेतल्याने सिंथियाचा जीव गेला.
हे वाचा - एक गोळी हिरावेल आई होण्याचं स्वप्न; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल घेऊ नका
आरोग्य प्रशासनाने हे क्लिनिक बोगस असल्याचं सांगितलं. इथला स्टाफ सर्जरी करण्यासाठी प्रशिक्षित नाही आहे. सिंथियाच्या मृत्यूनंतर तिथं पोलीस येण्याआधीच तिथले सर्व कर्मचारी पळाले. आता सिंथियाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रीतक्षा आहे. त्यानंतर तिच्या मृत्यूचं खरं कारण समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle