जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक

छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक

छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक

हृदय आणि फुफ्फुसाच्या मध्ये डॉक्टरांना एक विचित्र वस्तू दिसली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 ऑक्टोबर : आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी छातीत वेदना (Chest Pain) होतात. सामान्यपणे छातीत दुखू लागलं की आपल्या हार्ट अटॅक किंवा हृदयाचा इतर कोणता आजार तर नाही ना, अशीच भीती वाटते. पण यामागे आणखी एक कारण असू शकतं, ते म्हणजे तुमच्या छातीत काहीतरी अडकलं असण्याची शक्यता आहे (Weird Thing Stuck in Chest). ज्याची माहिती तुम्हाला नसले. एका व्यक्तीसोबत असंच झालं. 56 वर्षांच्या व्यक्तीच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याच्या छातीचा एक्स-रे  (X-Ray) काढला, सिटी स्कॅन (CT Scan) केलं. रिपोर्टमध्ये त्याच्या छातीत काहीतरी अडकल्याचं दिसलं. एक टोकदार वस्तू  (Sharp Object) त्याचं फुफ्फुस (Lungs) आणि हृदयाला (Heart) छेद देत होती. हे वाचा -  चमत्कार! कोमात असताना झालं बाळ; शुद्धीवर येताच महिलेला बसला धक्का तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याची तात्काळ सर्जरी केली. तेव्हा हृदयात त्यांना जे सापडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. कारण फुफ्फुस आणि हृदयात अडकलेली ती वस्तू म्हणजे चक्क सिमेंटचा तुकडा होता (Doctors Pick Piece of Cement) . तब्बल 10 सेंटिमीटर लांबीचा हा धारदार तुकडा होता. आता हृदयात सिमेंटचा तुकडा कसा गेला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या व्यक्तीला ऑस्टियोपरोसिस  होता. ज्यामुळे त्याच्या मणक्याचं हाड फ्रॅक्चर होत होतं. या समस्येतून मुक्ती मिळावी  म्हणून डॉक्टरांनी त्याचं काइफोप्लास्टी (kyphoplasty) केलं होतं. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सिमेंट मणक्याच्या हाडांमध्ये इंजेक्ट केलं जातं. जेणेकरून हाडांची लांबी पूर्ववत होईल. पण या व्यक्तीच्या हाडांवर हे सिमेंट नीट लागलं नाही आणि सिमेंटचा तुकडा निघाला. फक्त दोन टक्के प्रकरणात काइफोप्लास्टी फेल होते. त्यामुळे तसं हे दुर्मिळ प्रकरण होतं. हे वाचा -  अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्…; हा VIDEO पाहून बसेल धक्का या व्यक्तीच्या हाडांमधील सिमेंटचा तुकडा निघून तो नसांमध्ये गेला आणि नसांमधून हृदयाच्या भिंतीत अडकला. फुफ्फुसांमध्येही त्याने छेद केला. यामुळेच या व्यक्तीच्या छातीत वेदना होत होत्या आणि दोन दिवस त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. ऑपरेशन करून  हृदय आणि फुफ्फुसात अडकलेला हा सिमेंटचा तुकडा काढण्यात आला आणि छेद सील केला. महिनाभरात हा रुग्ण बरा झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात