मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ही एक गोळी हिरावू शकते तुमचं आई होण्याचं स्वप्नं; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल घेऊ नका

ही एक गोळी हिरावू शकते तुमचं आई होण्याचं स्वप्नं; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल घेऊ नका

आता जरी तुम्हाला फायद्याची वाटत असली तरी भविष्यात या गोळीमुळे तुम्हाला बऱ्याच समस्या उद्भवतील.

आता जरी तुम्हाला फायद्याची वाटत असली तरी भविष्यात या गोळीमुळे तुम्हाला बऱ्याच समस्या उद्भवतील.

आता जरी तुम्हाला फायद्याची वाटत असली तरी भविष्यात या गोळीमुळे तुम्हाला बऱ्याच समस्या उद्भवतील.

    मुंबई, 08 ऑक्टोबर : नवविवाहित, तसंच तरुण दाम्पत्यांमध्ये लैंगिक संबंधांचं प्रमाण जास्त असणं ही नॉर्मल गोष्ट आहे; मात्र एखाद्या वेळी चुकून गर्भनिरोधक साधनांचा (Contraceptives) वापर करायचा राहून गेला, तर गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा होण्याची शक्यता वाटली, तर काही स्त्रियांना असं वाटतं, की आपण अजून यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. तसंच नव्या जोडप्यांना एकमेकांना वेळही द्यायचा असतो, फिरायचं असतं, एकमेकांना समजून घ्यायचं असतं. हे सगळं व्हायच्या आत गर्भारपण आलं, तर सगळंच अवघड होऊन बसतं. म्हणूनच मग असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास पटकन मेडिकलमध्ये जाऊन अॅबॉर्शन पिल्स (Abortion Pills) अर्थात गर्भपातासाठीच्या गोळ्या घेऊन येतात. त्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाचा किंवा डॉक्टर्सचा सल्ला घेण्याची गरजही अनेकांना वाटत नाही. जाहिरातीत पाहिलेलं असल्यामुळे कोणीही त्या गोळ्यांचा अगदी सहजपणे वापर करतं; त्या गोळ्या त्या वेळपुरत्या दिलासादायक वाटल्या, तरी त्यांचे दुष्परिणाम दीर्घ काळासाठी (Side Effects of Abortion Pills) भोगावे लागू शकतात. ही बाब अनेकांना आणि अनेकींना माहितीच नसते.

    आत्ता मातृत्व नकोय म्हणून घेतल्या जाणाऱ्या या गोळ्यांमुळे भविष्यात कदाचित कधीच मातृत्व न मिळण्याचा धोकाही उत्पन्न होऊ शकतो. म्हणूनच या गोळ्या नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या जायला हव्यात. प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार कोणत्या गोळ्या, कशा नि किती घ्यायच्या याचा सल्ला डॉक्टर देतात. या गोळ्यांमुळे होणारे साइड इफेक्ट्स किती भयावह आहेत, याची माहिती घेऊ.

    हे वाचा - Explainer - विमान प्रवासात बाळाचा जन्म झाल्यास त्याचं जन्म ठिकाण काय असतं?

    अनेक महिलांच्या शरीरात रक्ताल्पता अर्थात रक्ताची (Anemia) कमतरता असते. त्यामुळे अनेक स्त्रिया अॅनिमिक असतात. अॅबॉर्शन पिल्स घेतल्यानंतर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातली रक्ताची कमतरता आणखी वाढते आणि अॅनिमियाचा धोका अधिकच गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आधीच अॅनिमिक असलेल्या स्त्रियांनी तर या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय मुळीच घेऊ नयेत.

    या अॅबॉर्शन पिल्स शरीरात तयार होणाऱ्या प्रोजेस्टेरॉन (Projesteron) या प्रेग्नन्सी हॉर्मोनवर प्रभाव टाकतात. त्यामुळे भ्रूण गर्भाशयापासून वेगळा होऊन बाहेर येतो. गर्भाशय आकुंचित असल्यामुळे अधिक रक्तस्राव होऊन महिलेला जास्त त्रास होतो. हे ब्लीडिंग काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत चालू शकतं. शिवाय प्रोजेस्टेरॉनवर प्रभाव पडल्यामुळे संबंधित स्त्रीच्या पुनरुत्पादन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.

    या गोळ्यांमुळे होणाऱ्या गर्भपातावेळी भ्रूणासोबतच अन्य काही घटकही शरीराबाहेर पडतात. त्यामुळे महिलांना पोटदुखीबरोबरच पाय आखडणं, (Pains) दुखी, नॉशिया, डायरिया, ताप आदी विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात.

    हे वाचा - छातीतील वेदनेने त्रस्त होती व्यक्ती; हृदयात सापडलं असं काही की डॉक्टरही शॉक

    काही महिलांमध्ये या गोळ्यांमुळे गर्भपात अर्धवट होतो. भ्रूण पूर्णपणे बाहेर पडून जात नाही. अशा परिस्थितीत सर्जरीही करावी लागू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, या गर्भपातासाठी गोळ्या खायची वेळ आलीच, तर स्वतःचं डोकं चालवून औषधं विकत न घेता डॉक्टरांचा आणि खासकरून स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ही औषधं घ्यावीत, जेणेकरून नंतर पश्चात्तापाची पाळी येणार नाही.

    डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.

    First published:
    top videos

      Tags: Health, Lifestyle, Medicine, Pregnancy