मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! नवरी नव्हे तर मृतदेहांचा मेकअप करते ही तरुणी; डेडबॉडीसाठीही ब्रँडेड प्रोडक्ट्स

OMG! नवरी नव्हे तर मृतदेहांचा मेकअप करते ही तरुणी; डेडबॉडीसाठीही ब्रँडेड प्रोडक्ट्स

मृतदेहसुद्धा आपल्या अंत्यसंस्कारात नटून थटून तयार होतात.

मृतदेहसुद्धा आपल्या अंत्यसंस्कारात नटून थटून तयार होतात.

मृतदेहसुद्धा आपल्या अंत्यसंस्कारात नटून थटून तयार होतात.

  मुंबई, 17 सप्टेंबर :  फिल्म, सीरिअलमध्ये अभिनेते-अभिनेत्रींना मेकअप (Makeup) केला जातो. लग्नात नवरा-नवरीला मेकअप केला जातो. एखादा सण असो, पार्टी असो किंवा अगदी दररोज तुम्हीसुद्धा हलकासा का होईना मेकअप करताच. यावेळी ब्रँडेड मेकअप वापरण्याकडे कल असतो. पण कधी मृतदेहांना मेकअप केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तेसुद्धा ब्रँडेड मेकअप (Dead Bodies makeup) . हो बरोबर वाचलंत. मृतदेहसुद्धा आपल्या अंत्यसंस्कारात नटून थटून तयार होतात आणि डेडबॉडीना मेकअप करणारेही बरेच मेकअप आर्टिस्ट (Make Up Artist) आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एलिन होलिस.

  फ्युनरल डायरेक्टर (Funeral Director) एलिन होलिस जिवंत नव्हे तर फक्त मृत माणसांचाच मेकअप करते.  एलिन गेल्या अनेक वर्षांपासून मृतदेहाला मेकअप करण्याचा व्यवसाय (Business) करते.

  एलिनाने म्हणते, 'एखादी व्यक्ती मृत झाली आहे, तिचा मेकअप करून काय फायदा,' असं जर कोणाला वाटत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.  मृत्यूनंतरही व्यक्ती सुंदर दिसू शकतात. मृत्यूनंतरही आपल्या सौंदर्याविषयी लोकांनी चर्चा करावी, असं वाटणं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. त्यामुळे मी मृतदेहांचादेखील मेकअप करते.

  हे वाचा - सेक्स करून निवडला जातो नवरा; संबंधांसाठी वडीलच लेकीला बांधून देतात लव्ह हट

  एलिनने सोशल मीडियावर (Social Media) मृतदेहांचा मेकअप करतानाचा व्हिडिओ शेअर करत असते.  तिच्या टिकटॉक अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी एलिन नवे व्हिडिओ तयार करून शेअर करत असते. एका मृतदेहाचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ नुकताच तिने शेअर केला आहे. या व्हिडिओला तब्बल साडेसात लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत एलिनने मेकअपसाठी कोणतं साहित्य वापरलं जातं तेदेखील शेअर केलं आहे.

  हे वाचा - रस्त्यावर चालता चालताच हजामत; सायकलवरील फिरत्या सलूनचा VIDEO पाहिलात का?

  मृतदेहाचा मेकअप करण्यासाठी एलिनाकडे महागडी सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics) असलेलं किट (Kit) आहे. ती फाउंडेशनपासून लिपस्टिक आणि आय-लायनरपर्यंत सर्व प्रसाधनांचा वापर करते.  हे किट पाहून अनेक लोकांनी एलिनाचं विशेष कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका मुलीनं लिहिलं, की 'अशी महागडी उत्पादनं माझ्याकडेदेखील नाहीत.' हा व्हिडिओ पाहताना मेकअप किटमधील काळ्या रंगापासून ते लाल रंगापर्यंतच्या विविध शेड्समधल्या लिपिस्टकवर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्याशिवाय राहत नाही.

  First published:

  Tags: Beauty tips, Dead body, Lifestyle