मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ना डायलिसिसची गरज, ना ट्रान्सप्लांटची; किडनी रुग्णांसाठी आता Artificial Kidney

ना डायलिसिसची गरज, ना ट्रान्सप्लांटची; किडनी रुग्णांसाठी आता Artificial Kidney

ब्लड प्रेशरवर ही कृत्रिम किडनी (Artificial kidney) कार्य करेल.

वॉशिंग्टन, 01 ऑक्टोबर : किडनीचा (Kidney) विकार (Kidney disease)  झाल्यानंतर आपल्याकडे दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)  आणि दुसरा म्हणजे डायलिसिस (Dialysis) . हे दोन्ही पर्याय अत्यंत खर्चिक असतात, तसेच ते तेवढे खात्रीशीरही नसतात; पण आता किडनीचा आजार झालेल्या रुग्णांसाठी (Kidney patient) चांगली बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी चक्क एक कृत्रिम किडनी (First Artificial Kidney) तयार केली आहे, जी खऱ्या किडनीप्रमाणेच काम करील.

अमेरिकेतल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधकांच्या एका पथकाने ही किमया करून दाखवली आहे. हे सर्व संशोधक दी किडनी प्रोजेक्टचा (The Kidney Project) भाग आहेत. किडनीसंबंधी आजारावर बायोआर्टिफिशिअल किडनी (Bioartificial Kidney) बनवण्याच्या उद्देशाने हे सर्व तज्ज्ञ संशोधन करत आहेत. अमेरिकेतला आरोग्य आणि मानव सेवा विभाग आणि अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी यांच्यामध्ये असलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ‘किडनी-एक्स’ (Kidney X) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. किडनीशी संबंधित आजारांना आळा घालणं, त्यांचं निदान आणि उपचार पद्धती अधिक प्रगत करणं या उद्देशाने या प्रकल्पात संशोधन केलं जातं.

हे वाचा - Shocking! डोक्यात घुसून खाल्ला संपूर्ण मेंदू; अमिबाने घेतला चिमुकल्याचा जीव

मिळालेल्या माहितीनुसार, किडनी प्रोजेक्टने या कृत्रिम किडनीमध्ये हिमोफिल्टर (Haemofilter) आणि बायोरिअॅक्टर (Bioreactor) या दोन भागांना जोडलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये किडनी प्रोजेक्टने विविध प्रयोगांमध्ये हिमोफिल्टर आणि बायोरिअॅक्टरची यशस्वी चाचणी केली आहे. हिमोफिल्टर रक्तातले अनावश्यक आणि घातक घटक बाजूला करतो, तर बायोरिअॅक्टर रक्तातले इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्याचं काम करतो. या पथकाने तयार केलेली कृत्रिम किडनी वापरकर्त्याचा फक्त त्रास कमी करत नाही, तर विविध औषधांपासून होणारे दुष्परिणाम आणि आजारांपासूनही बचाव करते.

संशोधकांनी सांगितलं, की त्यांनी तयार केलेली ही कृत्रिम किडनी शरीरातल्या पेशींना मदत करेल. तसंच, शरीराचा इम्युन रिस्पॉन्स या किडनीला ‘बाहेरील घटक’ समजून त्याचा विरोधही करणार नाही. “आम्ही आता हिमोफिल्टर आणि बायोरिअॅक्टर या किडनीला जोडून दाखवले आहेत. त्यामुळेच हा संपूर्ण सेट किडनीऐवजी शरीरात बसवण्यासाठी तयार आहे,” असं मत संशोधकांनी व्यक्त केलं. आता अधिक पुढच्या स्तरावरच्या प्रीक्लिनिकल चाचण्यांच्या मदतीने हे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्याचा संशोधकांचा मानस आहे.

हे वाचा - Smart Toilet: आता हे कमोड घेणार आरोग्याची काळजी; सांगणार आपले आजार

प्रीक्लिनिकल देखरेखीसाठी स्मार्टफोनच्या आकाराचं एक उपकरण यशस्वीपणे प्रत्यारोपणही केलं आहे. यासाठी किडनी प्रोजेक्टच्या पथकाला किडनीएक्सच्या प्रथम स्तरावरच्या कृत्रिम किडनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सहा पथकांनी यात पुरस्कार प्राप्त केला होता.

First published:

Tags: Health, Lifestyle