वॉशिंग्टन, 01 सप्टेंबर : सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) जगभर धुमाकूळ घालतो आहे. लहान मुलांनाही कोरोना संसर्ग झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे पालक आपल्या मुलांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. कोरोनाच्या या दहशतीत एका अमिबाने (Amoeba) एका चिमुकल्याचा जीव घेतला आहे. डोक्यात घुसून ब्रेन इटिंग अमिबाने (Brain Eating Amoeba) लहान मुलाचा संपूर्ण मेंदू खाल्ला , यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील (Texas) ही धक्कादायक घटना आहे. ब्रेन इटिंग अमिबाने लहान मुलाचा जीव घेतला आहे. वॉटर पार्कमध्ये हा चिमुकला या अमिबाच्या संपर्कात आला होता. यानंतर सहा दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. रिपोर्ट नुसार अर्लिंग्टनमधील वॉटर पार्कमधील स्प्लॅश पॅडमुळे मुलाला जीवघेण्या अमिबाचा संसर्ग झाला. स्पॅलश पॅडवर लावण्यात आलेले स्प्रिंकलर, फवारे, नोझल आणि इतर वॉटर स्प्रेची वेळोवेळी स्वच्छता होत नाही. त्यामुळे त्यावर ब्रेन इटिंग अमिबा जमा होतात. हे नाक किंवा तोंडातून मानवी शरीरात प्रवेश करतात आणि मग मेंदूपर्यंत पोहोचून मेंदूला हानी पोहोचवतात. ज्यामुळे संंबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. हे वाचा - तुमच्या बाळाला खूप स्वच्छ-स्वच्छ ठेवताय? प्रतिकारशक्तीवर होऊ शकतो असा परिणाम अर्लिंग्टनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, शहर आणि टेरेंट काऊंटी पब्लिश हेल्थने 5 सप्टेंबरला एका मुलाला अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. उपचारादरम्यान 11 सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी याची तपासणी सुरू केली. अधिकाऱ्यांनी स्प्लॅश पॅडच्या पाण्यात अमिबा असण्याला पुष्टी दिली आहे. यानंतर अर्लिंगटनमधील सर्व सार्वजिनिक स्प्लॅश पॅड बंद करण्यात आले आहे. हे वाचा - धक्कादायक! मानेवर बसलं वटवाघूळ, 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा अमेरिकेतील सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार या अमिबामुळे की या अमिबामुळं दूषित झालेलं पाणी प्यायल्याने काही धोका नाही, मात्र हे पाणी तुमच्या नाकात गेलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. कारण हा अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो. त्यामुळे मायग्रेन, हायपरथर्मिया, मान आखडणं, उलट्या, अत्यंत थकवा, भ्रमिष्टपणा यासारखे आजार होतात. सर्वात वाईट गोष्ट काय, तर या अमिबाचा संसर्ग तपासणारी कुठलीही चाचणी सध्या उपलब्ध नाही. आणि रुग्णामध्ये लक्षणं दिसण्यास काही काळ जावा लागतो. तोवर त्याचा मृत्यूही ओढवू शकतो. 1983 ते 2010 या काळात या अमिबामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय 2010 ते 2019 या काळात 34 लोकांना संसर्ग झाल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रीवेन्शन (सीडीसी)ने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.