मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Shocking! छातीचा झाला दगड, फुग्यासारखे फुगू लागले ब्रेस्ट; सर्जरीनंतर महिलेची झाली भयंकर अवस्था

Shocking! छातीचा झाला दगड, फुग्यासारखे फुगू लागले ब्रेस्ट; सर्जरीनंतर महिलेची झाली भयंकर अवस्था

महिलेची अवस्था इतकी बेकार झाली आहे की तिला हलताही येत नाही आहे.

महिलेची अवस्था इतकी बेकार झाली आहे की तिला हलताही येत नाही आहे.

महिलेची अवस्था इतकी बेकार झाली आहे की तिला हलताही येत नाही आहे.

वारसॉ, 10 सप्टेंबर : अनेकदा एका आजारावरील उपचार करताना दुसरा आजार बळावतो किंवा दुसऱ्या आजाराचं निदान होतं आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम होतात. असंच काहीसं झालं पोलंडमधील (Poland)  एका महिलेसोबत. ब्रेस्ट कॅन्सरने (Breast cancer) ग्रस्त असलेल्या या महिलेला असा विचित्र आजार झाला. ज्यामुळे तिची छाती दगडासारखी कडक झाली आहे. तर तिचे ब्रेस्ट फुग्यासारखे फुलू लागले आहेत (Woman chest turns stone breast swallon).

मर्सीसाइडमध्ये (Merseyside) राहणारी 37 वर्षांची हेलेन स्टॅनीजेवस्का (Helen Stanizewska). अचानक तिच्या छातीत तसंच खांद्याच्या खालील आणि कोपराच्या वरील भागातील हातात तीव्र वेदना होऊ लागल्या. जेव्हा तपासणी केली तेव्हा या दोन्ही ठिकाणी ट्युमर (Breast Tumour) असल्याचं निदान झालं. 2020 मध्ये तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं  निदान झालं.

हे वाचा - बापरे! पोटदुखीमुळे महिलेने गमावले आपले हातपाय; पोटातील वेदना हलक्यात घेऊ नका

ट्युमर काढण्यासाठी सर्जरी गरज होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार हेलेनाने सर्जरी केली. सर्जरी करून ट्युमर काढून टाकण्यात आला. पण ऑपरेशन केल्याच्या वर्षभरातनंतर तिला पुन्हा कॅन्सर झाला आणि तिला आता पुन्हा सर्जरी करावी लागली.

पण सर्जरीनंतरही तिच्या छाती आणि हातातील वेदना कमी झाल्या नाहीत. उलट तिची अवस्था अधिकच भयंकर झाली. तिची छातीत दगडासारखी कडक झाली. ज्यामुळे तिला हलताही येत नाही आहे.

डॉक्टरांनी सांगितलं हेलेनाला आयुष्यभर असं जगावं लागेल. तिला लिम्फेडेमा (lymphedema) हा आजार आहे. ज्यावर कोणताच उपचार नाही. यामध्ये बॉडीचे टिश्यू फुलतात आणि त्यामध्ये तीव्र वेदना होता.

हे वाचा - नशीबवान! 'प्लेन, ट्रेन, कार, बस' 7 भयंकर अपघात; वारंवार मृत्यूला दिला चकवा

हेलेनाचं शरीरही सातत्याने फुगत चाललं आहे. सुरुवातीला तिची बोटं सुजू लागली. त्यानंतर हळूहळू हातही सुजू लागला. आता तिची अवस्था भयंकर झाली आहे. तिची छाती आणि बाजू सुजून दगडासारखे टणक झाली आहेत. छाती दगडासारखी झाली असली तरी ती वाढते आहे. तिला असह्य वेदना होतात. ज्यामुळे तिला रात्रभर झोपही लागत नाही.

First published:
top videos

    Tags: Breast cancer, Health, Lifestyle