बुडापेस्ट, 09 सप्टेंबर : अनेकदा आपण शरीरातील छोट्या छोट्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोटातील वेदना (Stomach pain). पोटदुखी (Stomach ache) झाली की आपण त्याला फार गांभीर्याने घेत नाही. बहुतेक वेळा वेदनाशामक औषध घेतो, त्यापासून तात्पुरता आराम मिळाला की आपण पोटदुखी विसरून जातो. किती तरी वेळा तर दुर्लक्षच करतो. पण अशाच पोटदुखीमुळे महिलेचं आयुष्यच बदललं पोटदुखीमुळे तिला चक्क आपले हातपाय गमावावे लागले आहेत (Woman lost limbs due to infection).
हंगरीत (Hungary) राहणारी 39 वर्षांची मोनिका (Monika Tothne Kaponya) पोटदुखीने हैराण होती. तिच्या ओटीपोटात अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. ती डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या. ज्यामध्ये तिला सेप्सिस (sepsis)असल्याचं निदान झालं. ज्याचा परिणाम तिच्या शरीराच्या इतर भागावरही होऊ लागला. यामुळे तिला आपले हातपायही गमवावे लागतील, असं डॉक्टरांनी तिला सांगितलं.
हे वाचा - नशीबवान! 'प्लेन, ट्रेन, कार, बस' 7 भयंकर अपघात; वारंवार मृत्यूला दिला चकवा
मोनिकाने Pecs Aktual वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, तिच्या हातापायाला व्हस्क्युलर ऑक्लुजन (vascular occlusion) ही गंभीर समस्या झाली होती. यामुळे तिच्या नसांमध्ये रक्त जमा झालं, ते प्रवाहित होत नव्हतं. ऑपरेशन करून ती बरी होईल असं डॉक्टरांनी सांगितलं पण तिचे हातपाय कापल्याशिवाय पर्याय नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सुरुवातीला तिचा एक पाय कापण्यात आला. त्यानंतर सात दिवसांनी दुसरा पाय कापला. तीन दिवसांनी तिचा एक हातही कापून टाकला. नसा नीट करण्याचा कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे मोनिकाचे एकामागोमाग एक असे 16 ऑपरेशन करावे लागले. आता ती फक्त एका हातानेच आपले काम करू शकते, असं डॉक्टर म्हणाले.
हे वाचा - चमत्कार! ऑनलाईन गेम खेळता खेळता 'मृत्यू'; 20 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला तरुण
मोनिकाच्या या समस्येला आनुवंशिक कारणही जबाबदार आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांना अल्सर होता. मोनिकालाही दोन वर्षांपूर्वी पायाला जखम झाली होती, ज्यामुळे तिला अल्सर झालं. त्यानंतर तिला पोटदुखीची समस्या झाली आणि आपल्यासोबत असं काही होईल याचा स्वप्नातही तिने विचार केला नव्हता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Pain, Stomach, Stomach pain, Surgery