Home /News /lifestyle /

तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? वयानुसार Crocin, Calpol, Dolo चे हे आहे योग्य प्रमाण

तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? वयानुसार Crocin, Calpol, Dolo चे हे आहे योग्य प्रमाण

What is the exact dose of Paracetamol: आपल्याकडे अनेक लोकं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल (paracetamol) घेत असतात. मात्र, त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. पॅरासिटामॉलमध्ये स्टिरॉइड्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा डोस तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 जानेवारी : आजारी पडल्यानंतर पॅरासिटामॉलशी (paracetamol) संबंध आला नाही, असे क्विचितच घडत असेल. भारतातील बहुतेक लोक पॅरासिटामॉल वापरतात. थोडीशी डोकेदुखी असो किंवा हलका ताप (Fiver) असो, लोक प्रत्येक गोष्टीत कॅल्पोल (Calpol), क्रोसिन (Crocin), डोलो (Dolo) सारखी पॅरासिटामॉल औषधे घेतात. मात्र, बहुतेक लोकांना त्याचे अचूक प्रमाण माहित नाही. पॅरासिटामॉलमध्ये स्टिरॉइड्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा डोस तुमच्या आरोग्यासाठी अपया खूप हानी पोहोचवू शकतो. पॅरासिटामॉलचा वापर सामान्यतः ताप, मायग्रेन, मासिक पाळीत वेदना, डोकेदुखी, दातदुखी, शरीरदुखी यांसारख्या परिस्थितींमध्ये केला जातो. कॅल्पोल (Calpol), क्रोसिन (Crocin), डोलो, सुमो एल Sumo L), काबिमोल (Kabimol), पॅसिमोल (Pacimol)अशा अनेक नावांनी ते औषधांच्या दुकानात उपलब्ध आहे. तापामध्ये पॅरासिटामॉलचा योग्य डोस काय आहे? ड्रग्स डॉट कॉमच्या Drugs.com मते, जर सामान्य प्रौढ व्यक्तीला ताप असेल, तर यूएस मार्गदर्शक तत्त्वानुसार, 4 ते 6 तासांच्या कालावधीत 325 मिलीग्राम ते 650 मिलीग्राम पॅरासिटामॉलचा डोस दिला जाऊ शकतो. जर हा वेळ 8 तासांपर्यंत असेल तर त्याला 1000 मिलीग्रामपर्यंत औषध दिले जाऊ शकते. मात्र, व्यक्तीचे पूर्वीचे आजार, वजन, उंची, वातावरण याच्या आधारेही डोस ठरवला जातो. मार्गदर्शक तत्त्वानुसार, तापामध्ये 500 मिलीग्राम पॅरासिटामॉल 6 तासांनंतरच घ्यावे. लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना खूप काळजी घ्यावी लागते. जर मुलाला ताप असेल आणि एक महिन्यापेक्षा कमी वय असेल तर 10 ते 15 मिलीग्राम पॅरासिटामॉल प्रति किलो वजन 4 ते 6 तासांच्या अंतराने दिले जाते. हेच प्रमाण 12 वर्षांपर्यंतच्या मुलाला 6 ते 8 तासांच्या अंतराने द्यावे. या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! पेनमध्ये पॅरासिटामॉलची योग्य मात्रा जर एखाद्या सामान्य प्रौढ व्यक्तीचं शरीर दुखत असेल तर 325 ते 650 मिलीग्राम पॅरासिटामॉल औषध 4 ते 6 तासांच्या अंतराने घ्यावे. त्याच वेळी, एक हजार मिलीग्राम औषध 6 ते 8 तासांच्या अंतराने घ्यावे. वेदना कमी करण्यासाठी 500 मिलीग्राम औषध 4 ते 6 तासांच्या अंतराने घेतले पाहिजे. दुसरीकडे लहान मुलांसाठी 10 ते 15 मिलीग्राम प्रति किलो शरीराच्या वजनाच्या हिशोबाने 6 ते 8 तासांच्या दरम्यान दिले पाहिजे. पॅरासिटामोल घेण्यापूर्वी महत्वाची खबरदारी वेबएमडीच्या बातमीनुसार, जर तुम्ही तापामध्ये तीन दिवसांपासून पॅरासिटामोल औषध घेत असाल आणि ताप उतरत नसेल, तर ते लगेच सोडून द्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. कोणत्याही प्रकारच्या वेदनांमध्ये पॅरासिटामॉल 10 दिवसांपेक्षा जास्त काळ घेऊ नये. याशिवाय यकृताची समस्या, किडनीची समस्या, अल्कोहोलची समस्या आणि कमी वजनाच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटामॉल घेऊ नये. थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा पॅरासिटामोल ओव्हरडोजचे दुष्परिणाम पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोजमुळे काही वेळा साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतो. अॅलर्जी, त्वचेवर पुरळ उठणे, रक्ताचे विकार अशा समस्या असू शकतात. याशिवाय पॅरासिटामॉलच्या चुकीच्या वापरामुळे यकृत आणि किडनी खराब होण्याचा धोका असतो. पॅरासिमोलच्या ओव्हरडोसमुळे अतिसार, जास्त घाम येणे, भूक न लागणे, अस्वस्थता, उलट्या, ओटीपोटात दुखणे, गोळा येणे, वेदना, ओटीपोटात पेटके येऊ शकतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Health, Health Tips, Medicine

    पुढील बातम्या