Home /News /lifestyle /

या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! अशाप्रकारे घरीच घ्या काळजी

या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! अशाप्रकारे घरीच घ्या काळजी

अनेकदा वयस्कर व्यक्ती हाडांमधून (Bones) कट-कट असा आवाज (Bone Cracking Sound) येत असल्याची तक्रार करताना आढळतात. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. ही समस्या तीन आजारांसाठी निमंत्रण ठरू शकते.

मुंबई, 18 जानेवारी: अनेकदा वयस्कर व्यक्ती हाडांमधून (Bones) कट-कट असा आवाज (Bone Cracking Sound) येत असल्याची तक्रार करताना आढळतात. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. त्यापैकीच ही एक तक्रार असते. हाडांमधून असा आवाज येण्याची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे स्नायूंचा ताण, दुसरं म्हणजे वृद्धत्व आणि तिसरं म्हणजे संधीवात. यावर वेळीच उपचार न केल्यास हे आजार वाढत जातात आणि परिस्थिती गंभीर होते. त्यामुळं वेळीच या तक्रारीवर उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नियमित व्यायाम ही समस्या दूर ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दररोज व्यायाम (Daily Exercise) करणं. तंदुरुस्त राहण्यासाठी आठवड्यातून 150 मिनिटं व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तुमचं वय आणि जीवनशैलीला अनुरूप असे व्यायामप्रकार निवडा. घरकाम, बागकाम करणं किंवा जवळपास चालायला जाणं असे हलकेफुलके व्यायाम करू शकता. शारीरिक हालचाली आवश्यक आजकाल अनेक जण बैठं काम करतात. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम केलं जातं. त्यामुळे शरीर आखडल्यासारखं होतं. त्यामुळेही सांध्यांतून असा आवाज येऊ शकतो. त्यामुळे सतत शारीरिक हालचाली करणं आवश्यक आहे. तुम्ही दिवसभर एका ठिकाणी बसून काम करत असाल, तर किमान दर अर्ध्या तासाने जागेवरून उठण्याची सवय लावा. हे वाचा-Diabetes रुग्णांसाठी रामबाण इलाज आहेत या 4 गोष्टी; शुगर पातळी राहील नियंत्रणात स्ट्रेचिंगचा फायदा हाडांमधून येणाऱ्या कटकट अशा आवाजावर स्ट्रेचिंग (Stretching) हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. स्ट्रेचिंग केल्यानं सांध्यांना वंगण मिळण्यास मदत होते. त्यामुळे दररोज व्यायाम करताना स्ट्रेचिंगचे काही व्यायाम अवश्य करावेत. ताणतणाव दूर ठेवा आजकाल प्रत्येक आजारामागे तणाव (Stress) हे एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. काही जणांना असलेल्या तणावामुळेही त्यांच्या सांध्यातून आवाज येत असण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे तणाव दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी खोल श्वास घेणं, ध्यान करणं किंवा स्ट्रेस बॉलचा वापर करणं यांसारखे उपाय लाभदायी ठरतील. हे वाचा-वयाच्या 40 नंतर आरोग्याविषयी अनेकजण या 6 चुका करतात; आयुष्यभर भोगतात परिणाम स्वतःला शांत ठेवा वाढत्या वयाबरोबर सांध्यांमधलं कार्टिलेज (Cartilage) कमी होतं. त्यामुळे हाडांमधून कट-कट असा आवाज येतो. काही वेळा असा आवाज येत असतो तेव्हा वेदना होतात. तसंच सांध्यांना सूजही येते. काही वेळा एखाद्या दुखापतीनंतर असा आवाज येत असल्याचं आढळतं. त्यामुळे वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. अशी समस्या जाणवू लागते तेव्हा आपण शांत (Calm) राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बर्‍याच जणांना बोटं किंवा कोणतेही सांधे मोडण्याची सवय असते. असं करणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे हा त्रास वाढू शकतो.
First published:

Tags: Health, Health Tips, Healthy bones

पुढील बातम्या