• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तीव्र वेदना सहन करत पायाच्या तळव्यावर काढला टॅटू, फोटोसाठी येतेय लाखोंची ऑफर; पाहा VIDEO

तीव्र वेदना सहन करत पायाच्या तळव्यावर काढला टॅटू, फोटोसाठी येतेय लाखोंची ऑफर; पाहा VIDEO

तीव्र वेदना सहन (Woman artist made tattoo on sole of her feet goes viral) करत एका तरुणीनं तिच्या तळपायावर काढलेल्या टॅटूची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 24 नोव्हेंबर: तीव्र वेदना सहन (Woman artist made tattoo on sole of her feet goes viral) करत एका तरुणीनं तिच्या तळपायावर काढलेल्या टॅटूची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. शरीराच्या कुठल्याही भागावर टॅटू काढणं हे तसं वेदनादायकच (Painful Tattoo) काम असतं. टॅटू काढण्यासाठीची सुई लागल्यामुळे वेदना या होतातच. मात्र अनेक टॅटूप्रेमी टॅटूच्या आनंदापायी त्या वेदना हसत हसत सहन करतात. एका तरुणीने तर टॅटूप्रेमाची हद्दच केली. तिने चक्क पायाच्या तळव्यावर टॅटू काढला.
  View this post on Instagram

  A post shared by Lilith Cuoio (@lilztatz)

  वेदनादायी टॅटू पायाच्या तळव्याची त्वचा ही अत्यंत संवेदनशील असते. शरीराच्या इतर कुठल्याही भागाच्या तुलनेत तळपायावर टॅटू काढताना भयंकर वेदना होतात. मात्र अमेरिकेतील डेनवर शहरात राहणाऱ्या 24 वर्षांच्या लिलिथने हे धाडस केलं. लिलिथ ही स्वतः एक टॅटू आर्टिस्ट आहे. स्वतःच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू गोंदवणं तिला फारच आवडतं. मात्र यावेळी तिनं थेट तळपायावर टॅटू काढण्याचा निर्णय घेतला. टॅटूसाठी लाखो रुपये तळपायावर टॅटू काढणं हा आपल्या आयुष्यातील सर्वाधिक वेदनादायी अनुभव असल्याचं लिलिथनं म्हटलं आहे. तिनं आपला हा प्रयोग सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर तिला अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. विशेषतः काही पुरुष युजर्सनी तिला तळपायाच्या टॅटूचा फोटो पाठवण्याची मागणी केली. यासाठी ते पैसे द्यायलाही तयार झाले होते. आपल्या पायाच्या टॅटूत असं काय आहे, ज्यासाठी लोक पैसे द्यायला तयार होतायत, असा प्रश्न तिलाही पडला आहे. हे वाचा-बापरे! 19 व्या मजल्यावरून वृद्धेचा तोल गेला आणि...; भयंकर दुर्घटनेचा Live video फूट फॅटिश कम्युनिटी तिच्या पायाचा फोटो पाहण्यासाठी उत्सुक असणारे बहुतांश पुरुष हे फूट फॅटिश कम्युनिटीचे सदस्य असल्याचा अनुभव तिला आला. फॅटिश याचा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी वेडे असणारे, निस्सिम चाहते असणारे लोक. काही लोकांना पाय पाहण्याचं वेड असतं. एखाद्या व्यक्तीचे पाय तासनतास पाहत बसण्याचे ते शौकीन असतात. अशा शौकिनांकडून लिलिथला टॅटू काढलेल्या पायाचा फोटो पाठवण्यासाठी लाखो रुपये ऑफर केले जात आहेत.
  Published by:desk news
  First published: